नावाप्रमाणे या ठिकाणी मोठे गार्डन्स आहेत. हिरवेगार असणारे हे गार्डन्स एकमेकांजवळ असून मित्र, कुटुंबासह निवांत वेळ घालवण्यासाठी अगदी योग्य जागा आहेत.
दक्षिण मुंबईत असणाऱ्या या चोर बाजारात चांगलीच गर्दी असते. तुम्हाला येथे अनेक विंटेज गोष्टी पाहण्यास मिळू शकतात. या ठिकाणी शक्यतो सूर्यास्ताआधीच जाणं चांगलं, अन्यथा फार गर्दी असते.
मुंबईचा उल्लेख झाल्यानंतर गेट वे ऑफ इंडियाचा उल्लेख न होणं शक्य नाही. मुंबई पाहण्यासाठी येणारी प्रत्येक व्यक्ती गेट वे ऑफ इंडियाला नक्की भेट देते. शेजारी समुद्र आणि समोर ताज हॉटेल असं सुंदर दृश्य येथे असतं. सकाळी लवकर गेल्यास तुम्हाला येथे गर्दी भेटणार नाही.
अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये तुम्ही एशियाटिक लायब्ररी पाहिली असेल. सफेद रंगाच्या पायऱ्या, खांब आणि इमारती असणारी ही लायब्ररी मुंबईत आपली वेगळी ओळख निर्माण करत उभी आहे. सूर्यास्तावेळी येथील पायऱ्यांवर जाऊन तुम्ही निवांत वेळ घालवू शकता.
मुंबईत सर्वाधिक गर्दी असणाऱ्या ठिकाणांपैकी एक म्हणजे नरिमन पॉइंट येथील Queens Necklace. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वच या ठिकाणी असतात. येथून दिसणारं दृश्य हे एका राणीच्या हारासारखं असल्याने Queens Necklace म्हटलं जातं.
मुंबईतील हँगिंग गार्डन चांगलंच प्रसिद्ध आहे. येथून मुंबई फारच सुंदर दिसते. मुंबईतल्या धावपळीत कुटुंब, मित्रांसह निवांत वेळ घालवण्यासाटी हे उत्तम ठिकाण आहे.
वांद्रे येथील गल्ल्यांमध्ये मुंबईचा इतिहास लपला आहे. 24 गावं इथे वसलेली असून यामधील रणवार हे गाव फार प्रसिद्ध आहे. येथे 100 वर्षांपेक्षा जुनी घरं आणि इमारती आहेत. ही छोटी वस्ती इंडो-पोर्तुगीज कोलोनियल शैलीतील वास्तुकला दर्शवते. वळणदार जिने, घराची छतं अशा अनेक गोष्टी येथे आकर्षित करतात. हिल रोड आणि माउंट कार्मेल रोड दरम्यान हे वसलेले आहे.
पुढील वेळी जेव्हा तुम्ही ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरुन प्रवास करत असाल तेव्हा विक्रोळीमध्ये झाडांना आलेला गुलाबी रंगाचा बहर पाहण्यास विसरु नका. हा बहर पाहण्यासाठी तुम्हाला फुटपाथच्या बाजूला थांबावं लागेल. याला Pink Trumpet म्हणून ओळकलं जातं. डिसेंबर ते मे महिन्यात हे दृश्य पाहायला मिळतं.