रक्षाबंधन करताना आरतीच्या ताटात सर्वात महत्वाची वस्तू कोणती असेल, तर ती म्हणजे राखी. शास्त्रानुसार,भावाच्या हातावर राखी बांधल्याने वाईट शक्तींपासून त्याचे रक्षण होते.
चंदन फार पवित्र मानले जातं. शास्त्रानुसार, आरती ओवाळताना चंदनाचा टिळा भावाच्या कपाळावर लावल्यास त्याचे आयुष्य वाढते आणि ग्रहांच्या पिडांपासून रक्षण होते.
अनेक शुभ कार्यात अक्षतांचा वापर केला जातो. रक्षाबंधन करताना आरतीच्या ताटातील अक्षता डोक्यावर टाकावर टाकून, टिळा लावल्यास अनेक नकारात्मक शक्तींचा नाश होतो.
रक्षाबंधन करताना आरतीच्या ताटात नारळापासून बनलेले पदार्थ भावाला भरवावा. असं केल्याने भावाचं आयुष्य सुखी-समृद्धी होण्यास मदत होते.
रक्षाबंधन करताना आरतीच्या ताटात गंगाजल ठेवणं शुभ मानलं जातं .शास्त्रानुसार गंगाजल अनेक वाईट शक्तींपासून रक्षण करण्यास मदत करते.
आरतीच्या ताटात दिवा पेटवून भावाची ओवाळली केली जाते. असं केल्यास भावाचे आयुष्य दीर्घ होतं.
आरतीचे ताट हे मिठाईशिवाय अपूर्णचं आहे. शुभप्रसंगी गोड पदार्थ भावाला भरवून तोंड गोड केलं जातं. असे केल्याने भाऊ-बहिणीच्या नात्यातही पूर्वीपेक्षा अधिक गोडवा निर्माण होतो.