'ऑस्कर' हा चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा असा पुरस्कार समजला जातो.
गेल्या वर्षी 'लापता लेडीज'ला या पुरस्काराच्या शर्यतीमध्ये स्थान दिल्याचं सांगितलं जात होतं, पण हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
नुकतीच 2025 मध्ये ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या चित्रपटांची यादी समोर आली आहे.
यामध्ये पहिला चित्रपट 'कांगुवा' आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नव्हता.
दुसऱ्या क्रमांकावर 'द गोट लाइफ' या चित्रपटाचे नाव समोर आले आहे. हा मल्याळम चित्रपट आहे.
या यादीत 'संतोष' चित्रपटाचं देखील नाव आहे. हा एक हिंदी चित्रपट असून 10 जानेवारीला सिनेमागृहांमध्ये येणार आहे.
रणदिप हुडा अभिनीत 'वीर सावरकर' या चित्रपटाचासुद्धा ऑस्करच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
'ऑल व्ही इमेजीन एज लाइट' या मल्याळम चित्रपटाला जगभरातून अफाट लोकप्रियता मिळाली. यालासुद्धा ऑस्कर 2025 मध्ये प्रवेश मिळाला आहे.
'द गर्ल्स विल बी गर्ल्स' हा चित्रपट ऑस्करच्या यादीतील एक बहुचर्चीत चित्रपट आहे. हा चित्रपट तरुणाईने अगदी डोक्यावर घेतला होता.
भारतीय चित्रपटांच्या यादीतील शेवटचा चित्रपट 'पुतुल' आहे. हा इंदीरा धर यांनी दिग्दर्शित केलेला बंगाली चित्रपट आहे.