वरुथिनी एकादशीला गुळाचं दान केल्याने तुमच्या कुंडलीत सूर्याचे स्थान मजबूत होईल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील, सन्मान वाढतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
वैशाख अमावस्या आणि वरुथिनी एकादशीला, सत्तू खाण्याची आणि दान करण्याची परंपरा आहे. सत्तूचं दान केल्याने वैवाहिक जीवनात मधुरता वाढते आणि संतती वाढते.
वरुथिनी एकादशीला फळांचं दान केल्यास दहा हजार वर्षांच्या तपश्चर्येइतकं पुण्य प्राप्त होतं. या महिन्यात आंब्याचं दान करणं उत्तम मानलं जातं.
भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी वरुथिनी एकादशीला तीळ दान करा. तिळापासून बनवलेल्या मिठाईचे दान केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
वरुथिनी एकादशीला जाणाऱ्यांना आणि पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. असं केल्यानेकन्यादान केल्यासारखंच फळ मिळतं. आयुष्यातील दुःख दूर होतं.
आज तीर्थस्नान, दान, उपवास आणि भगवान विष्णूच्या वहार अवताराची पूजा केली जातं. हे एकादशीचं व्रत करणे म्हणजे अन्नदान आणि कन्यादानातून जे पुण्य मिळते, दोन्हीचं एकत्र पुण्य या व्रतातून मिळतं.
वरुथिनी एकादशीला अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत. या एकादशीनिमित्त त्रिपुष्कर योग जुळून आला आहे.