अर्जून तेंडुलकरची भारतीय संघात निवड?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरची भारतीय संघात निवड होण्याची शक्यता वाढली आहे.

Jun 15,2023

BCCI कडून बोलावणं

अर्जुन तेंडुलकरला BCCI कडून बोलावणं आलं आहे.

NCA मध्ये येण्याचा संदेश

अर्जुन तेंडुलकरला नॅशनल क्रिकेट अकॅडमीत येण्यास सांगण्यात आलं आहे.

अर्जुनसह 20 अष्टपैलू खेळाडूंना निमंत्रण

BCCI ने अर्जुनसह 20 अष्टपैलू खेळाडूंना NCA मध्ये बोलावलं आहे. हा स्पेशल कॅम्प 20 दिवसांसाठी आयोजित करण्यात आला आहे.

अर्जुनसह इतर सर्व खेळाडूंच्या खेळावर लक्ष्य

NCA मध्ये व्हीव्हीएस सहित अन्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनसह इतर सर्व खेळाडूंच्या खेळावर काम केलं जाणार आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मणची योजना

ही व्हीव्हीएस लक्ष्मणची योजना आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना उच्चस्तरीय क्रिकेटसाठी तयार केलं जाणार आहे.

अंडर 23 एमर्जिंग आशिया कप

या वर्षाच्या अखेरीस अंडर 23 एमर्जिंग आशिया कप होणार आहे. यासाठी बोर्डाची नजर प्रतिभावान खेळाडूंवर आहे.

अर्जुनसह इतर खेळाडू कोण?

या अष्टपैलू खेळाडूंमध्ये चेतन सकारिया, अभिषेक शर्मा, मोहित रेडकर, मानव सुथार, हर्षित राणा आणि दिविज मेहराही सहभागी आहेत.

IPL मध्ये पदार्पण

अर्जुनने यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने 4 सामन्यात 3 विकेट्स घेतले.

VIEW ALL

Read Next Story