एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने मस्कॉट जोडीचं अनावरण केलं. पुरुष आणि महिला क्रिकेटर्सची ही जोडी आहे.

आयसीसीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासठी महिला क्रिकेटर शेफाली वर्मा आणि अंडर-19 खेळाडू यश ढुल उपस्थित होते.

आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला असून यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, एलिस पैरी आणि जोस बटलर दिसत आहेत.

पुरुष आणि महिला क्रिकेटरची मस्कॉट जोडी समानता आणि विविधतेचं प्रतीक आहे. पुरुष मस्कॉटच्या हाती भॅट तर महिला मस्कॉटच्या हाती चेंडू दाखवण्यात आला आहे.

पुरुष आणि महिला क्रिकेटरच्या या जोडीला अद्याप नाव देण्यात आलेलं नाही. आयसीसीने क्रिकेट चाहत्यांना नाव सुचवण्याचं आवाहन केलं आहे.

27 ऑगस्टपर्यंत क्रिकेट चाहत्यांना या मस्कॉटला नावं सुचवायची आहेत. त्यानंतर यातलं एक नाव अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलं जाणार आहे.

आयसीसीने शेअर केलेल्या या व्हिडिओत एकाही पाकिस्तानी खेळाडूला दाखवण्यात आलेलं नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटर्सने नाराजी व्यक्त केली आहे.

VIEW ALL

Read Next Story