टीम इंडियाच्या नव्या ऑलराऊंडर खेळाडूची फिल्मी लव्हस्टोरी

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत ऑलराऊंडर शिवम दुबेने दमदार कामगिरी केलीय. पहिल्या दोन्ही सामन्यात शिवमने अर्धशतकी खेळी केली.

टी20 सामन्यातला आक्रमक खेळीने शिवम दुबेने निवड समितीचं लक्ष वेधलंय. टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियात त्याने दावा ठोकला आहे.

शिवम दुबेची लव्हस्टोरीही तितकीच फिल्मी आहे. जुलै 2021 मध्ये शिवमने गर्लफ्रेंड अंजुम खानबरोबर लग्न केलं. अनेक काळ ते एकमेकांना डेट करत होते.

शिवम आणि अंजुमचं लग्न मुंबईत झालं. आपल्या लग्नाचे फोटो त्याने सोशल मीडियावरही शेअर केले होते. नव्या आयुष्याला सुरुवात करत असल्याचं यात त्याने म्हटलं होतं.

शिवम दुबे हिंदू तर अंजुम खान मुस्लिम धर्मीय आहे. त्यामुळे दोघांचं लग्नही हिंदू-मुस्लिम पद्धतीने करण्यात आलं.

अंजुम खान मुळची उत्तर प्रदेशमली असून तीने अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीतून फाईन आर्टसमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय.

अंजुमला अभिनय आणि मॉडेलिंगचीही आवड आहे. अंजुमने हिंदी मालिका आणि काही म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे.

तर शिवम दुबे मुंबईत लहाणाचा मोठा झाला. 2019 मध्ये शिवमने बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

VIEW ALL

Read Next Story