एम एस धोनीचा नवा डॅशिंग लूक पाहिलात का?

Pooja Pawar
Oct 12,2024


एम एस धोनी नेहमी त्याच्या हेअर स्टाईल सोबत विविध प्रयोग करत असतो.


आयपीएल 2024 मध्ये धोनीचा लाँग हेअर विंटेज लूक चाहत्यांना फार आवडला होता.


धोनीने पुन्हा एकदा त्याची हेअरस्टाईल बदलली असून त्याच्या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अलीम हकीम याने धोनीच्या नव्या हेअर स्टाईलचे फोटो शेअर केले.


यात धोनी फारच हँडसम दिसत असून त्याच्या पुढे भलेभले अभिनेते सुद्धा फिके पडताना दिसतायत.


आयपीएल 2025 पूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार असून याआधी सर्व संघांना त्यांचे केवळ 6 खेळाडू रिटेन करायचे आहेत. तेव्हा एम एस धोनी आयपीएल 2025 मध्ये दिसणार हे जवळपास निश्चित आहे.


धोनीने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला तब्बल तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या. तर आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सला धोनीने त्याच्या नेतृत्वात 5 वेळा विजेतेपद जिंकवून दिले.

VIEW ALL

Read Next Story