भारताच्या नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. पहिला थ्रो फाऊल गेल्यानंतर दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 88.17 मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.
नीरज चोप्राच्या मनगटात प्रचंड ताकद आहे. पण ही ताकद त्याच्याकडे कुठून येते तुम्हाला माहिती आहे का?
नीरज चोप्राचे इंस्टाग्राम पाहिलात तर तो वर्कआऊट किती गांभीर्यान घेतो, हे लक्षात येईल. येथे त्याचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील.
नीरज स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करतो.
नीरज चोप्रा स्ट्रेंथ आणि कोअर ट्रेनिंगवर जास्त भर देतो.
तो स्क्वॅट्स, स्नॅचेस आणि स्विस बॉल क्रंच इ. देखील करतो.
लवचिकता वाढवण्यासाठी नीरज ड्रॅगन फ्लॅग व्यायाम देखील करतो. त्याला बॅरिअर जम्पिंग करणे आवडते.
कार्डिओ, धावणे आणि इतर उच्च तीव्रतेचे व्यायाम देखील तो नेहमी करतो.
स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नीरज बर्पी, स्क्वॅट्ससोबतच जीममध्ये अनेक अवजड वर्कआउट करताना दिसतो.