एशिया कप स्पर्धेनंतर पाच ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. दहा संघांमध्ये वर्ल्ड कपसाठी चुरस रंगणार आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेत करोडो क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत, त्या 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर.

भारत-पाक सामन्याच्या तिकिटांसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये ओढ लागली आहे. ऑनलाईन तिकिट विक्रि करणाऱ्या वियागोगो या साईटवर एक तिकिटाची किंमत तब्बल 19,51,580 रुपये इतकी देण्यात आली आहे.

बीसीसीआयची अधिकृत ऑनलाईन तिकिट विक्री कंपनी बूक माय शोवर या सामन्याची सर्व तिकिटं काही मिनिटातच विकली गेली. पण वियागोगोवर अद्याप काही तिकिटं शिल्लक आहेत.

क्रिकेट नेक्स्टने दिलेल्या रिपोर्टनुसार वियागोगोवर भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची किंमत 66 हजारापासून 19 लाखापर्यंत आहेत. किंमतीत सातत्याने बदल होत आहेत.

विशेष म्हणजे वियागोगवर वर्ल्ड कपची तिकिटी विक्रि करण्याची अधिकृतरित्या परवानगी नाही. पण या साईटवर वर्ल्ड कपची तिकंट सहज उपलब्ध आहेत आणि प्रचंड महागडी आहेत.

या साईटवर भारत-पाकिस्तान सामन्या व्यतिरिक्त इतर सामन्यांचीही तिकिटं उपलब्ध आहेत. पण त्या तुलनेत ती स्वस्त आहेत.

VIEW ALL

Read Next Story