युवराज सिंह यांचे वडील भारताचे क्रिकेट खेळाडू असण्याव्यतिरिक्त पंजाबी सिनेमाचे सुपरस्टार आहेत. यांनी 12हून आधिक सिनेमात काम केलं आहे.
संदीप पाटील यांनी साल 1985 मध्ये सहखेळाडू सैय्यद किरमानी सोबत 'अजनबी थे' या सिनेमात आपलं डेब्यू केलं होतं.
माजी कर्णधार कपिल देव यांनी 'चैन खुली की मैन खुली' आणि 'इक्बाल' सारख्या सिनेमात कॅमियो रोल केला आहे.
भारताचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी एक्टिंग केली आहे. गावस्कर यांनी मराठी सिनेसृष्टीतील 'सावली प्रेमाची' आणि 'मालामाल' यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.
माजी क्रिकेटर विनोद कांबळी यांनी चित्रपटात आपलं नशीब आजमावलं; परंतु त्यांना यश मिळालं नाही. त्यांनी 'अनर्थ' सिनेमात डेब्यू केलं होतं.
माजी क्रिकेटर शिखर धवन सुद्धा चित्रपटांमधून नजरेस आले आहेत. त्यांनी 'डबल एक्सेल' सिनेमात कॅमियो केला होता.
माजी क्रिकेटर अजय जडेजा यांनी सुद्धा सिनेसृष्टीत काम केलं. परंतु त्यांना चित्रपटात डेब्यू करताना यश मिळालं नाही.
माजी क्रिकेटर इरफान पठान सुद्धा सिल्वर स्क्रिन वर येऊन गेलेत. पठान यांनी साल 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कोबरा' या चित्रपटात काम केलं होतं.
एस श्रीसंत यांचा बिग बॉस या शॉ मध्ये डान्स पहायला मिळाला.
पूर्व क्रिकेटर श्रीसंत यांनी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवला. श्रीसंतनी 'अक्सर 2'आणि 'कॅबरे' सारख्या सिनेमात काम केलं आहे.
माजी क्रिकेटर हरभजन सिंह यांनी देखील सिनेमात काम केलंय. त्यांनी 'भाजी इन प्रॉब्लेम' आणि 'सेकेंड हँड हसबंड' सारख्या चित्रपटात काम केलं आहे.