OLA, Ather चं मार्केट टाइट होणार! फक्त 55 हजारात लाँच झाली इलेक्ट्रिक स्कूटर

Nov 22,2023

e-Sprinto ने लाँच केल्या स्कूटर

इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी e-Sprinto ने अधिकृतपणे दोन नव्या इलेक्ट्रिक स्कूटर रॅपो आणि रोमी यांना लाँच केलं आहे. यासह e-Sprinto च्या प्रोडक्ट लाइन-अपमध्ये एकूण 6 मॉडेल सहभागी झाले आहेत.

या दोन्ही स्कूटर बजेट फ्रेंडली आहेत. रोमीची किंमत फक्त 54 हजार 999 रुपये असून, रॅपोची किंमत 62 हजार 999 रुपये आहे.

या दोन्ही स्कूटरच्या लूक आणि डिझाइनमध्ये थोडा फरक आहे. पण मेकॅनिकली बरंच साम्य आहे.

Roamy

Roamy सर्वात स्वस्त मॉडेल असून तिची लांबी 1800 मिमी, रुंदी 710 मिमी आणि उंची 1120 मिमी आहे. तसंच 170 मिमीचा ग्राऊंड क्लिअरन्स आहे.

यामध्ये पोर्टेबल ऑटो कट ऑफ चार्जरसह लिथीअम/लीड बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 250 W क्षमतेचा BLDC हब मोटर देण्यात आली आहे.

कंपनीने यामध्ये IP65 वॉटरप्रूफ रेटिंगसह येणारा बॅटरी पॅक दिला आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 100 किमीची रेंज देते. हिचा टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे.

Rapo

Rapo इलेक्ट्रिक स्कूटरच लांबी 1840 मिमी, रुंदी 720 मिमी आणि उंची 1150 मिमी आहे. तसंच 170 मिमीचा ग्राऊंड क्लिअरन्स आहे.

यामध्येही पोर्टेबल ऑटो कट ऑफ चार्जरसह लिथीअम/लीड बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 250 W क्षमतेचा BLDC हब मोटर देण्यात आली आहे.

Rapo चा टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे. पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर 100 किमीचा प्रवास करण्यात सक्षम आहे.

याच्या पुढील भागात डिस्क ब्रेकसह 12 इंच रिम आणि मागील भागात ड्रम ब्रेकसह 10 इंचाची व्हील देण्यात आली आहे. याची पेलोड क्षमता 150 किलो आहे.

दोन्ही स्कूटरमध्ये कंपनीने रिमोट लॉक/अनलॉक, रिमोट स्टार्ट, इंजिन किल स्विच, चाइल्ड लॉक, पार्किंग मोड आणि युएसबी मोबाईल चार्जर सुविधा दिली आहे.

याशिवाय दोन्ही स्कूटरमध्ये डिजिटल कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये स्कूटरसंबंधी सर्व माहिती दिसेल.

VIEW ALL

Read Next Story