विमानतळावर गेलं असता तिथं साधी पाण्याची बाटलीसुद्धा 20 रुपयांऐवजी 100 रुपयांना मिळते. अगदी समोसासुद्धा 15 रुपयांऐवजी 350 रुपयांना मिळतो.
बाजारभावाच्या तुलनेत विमानतळावर कैक गोष्टी अतिशय महागड्या दरात विकल्या जातात. पण, एक गोष्ट मात्र अतिशय सोपी असते.
ती गोष्ट म्हणजे दारु. पण, मुळात दारु विमानतळावर स्वस्त का मिळते माहितीये?
इथं टॅक्स फ्री दुकानांमध्ये तुम्ही अगदी स्वस्तात दारू खरेदी करू शकता जिथं दारुवर कमीत कमी कर आकारला जातो.
ड्यूटी फ्री शॉपमध्ये विकल्या जाणाऱ्या दारुवर इंपोर्ट ड्यूटी टॅक्स, वॅट टॅक्स, एक्साईज ड्यूटी असे कर लागत नाहीत.
फक्त दारूच नव्हे, तर बॅग, परफ्यूम अशा महागड्या ब्रँडच्या वस्तूसुद्धा विमानतळावर स्वस्तात विकल्या जातात.
थोडक्यात महागड्या आणि कस्टम ड्यूटी असणाऱ्या गोष्टी विमानतळावर स्वस्त मिळतात.