जुळी मुलं किंवा 2 पेक्षा जास्त मुलं जन्माला आल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. यामागचे विज्ञान जाणून घेऊया.
जुळी मुलं ही मोनोजायगोटिक आणि डायजायगोटिक अशा 2 प्रकारची असतात. मोनोजायगोटिकला आयडेंटिकल ट्विन्सदेखील म्हणतात.
मोनोजायगोटिकमध्ये मुलं एकाच अंड्यातून विकसित होतात. जे नंतर वेगवेगळ्या भ्रूणांमध्ये विभाजित होतात.
मोनोजायगोटिक जुळ्यांमध्ये एकच डीएनए असतो. नेहमी समान लिंगाचे असतात.
डायजायगोटिक जुळी मुले 2 वेगवेगळ्या अंड्यात वाढतात. जे 2 वेगवेगळ्या स्पर्ममध्ये फर्टिलाइज होतात.
डायजायगोटिक जुळ्यांमध्ये वेगवेगळा डिएनए असतो. ते भिन्न लिंगाचे असू शकतात.
अनुवांशिक, फर्टिलिटी उपचार, आयव्हीएफ आणि आईचे वय यावर जुळी मुलं होण्याची शक्यता ठरते.