HDFC बँकचे डेबिट आणि क्रेडीट कार्डधारक आता करू नाही शकत हे काम...

  तुमच्याकडे एचडीएफसी (HDFC)बँकेचे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.  गेल्या काही दिवसांपासून तुम्ही क्रिप्टोकरेंसीबाबत अनेक बातम्या ऐकल्या असतील सरकारने अशा प्रकारच्या फसवणुकीतून वाचण्याासाठी बिटकॉइनला बेकायदा घोषित करण्यात आले होते. आता एचडीएफसी बँकने क्रेडीट कार्डधारक बिटकॉईनची खरेदी करू शकणार नाही. तसेच बँकेच्या प्रीपेड कार्डातूनही क्रिप्टो करन्सी खरेदी करू शकणार नाही. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 14, 2018, 05:49 PM IST
HDFC बँकचे डेबिट आणि क्रेडीट कार्डधारक आता करू नाही शकत हे काम... title=

नवी दिल्ली :  तुमच्याकडे एचडीएफसी (HDFC)बँकेचे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.  गेल्या काही दिवसांपासून तुम्ही क्रिप्टोकरेंसीबाबत अनेक बातम्या ऐकल्या असतील सरकारने अशा प्रकारच्या फसवणुकीतून वाचण्याासाठी बिटकॉइनला बेकायदा घोषित करण्यात आले होते. आता एचडीएफसी बँकने क्रेडीट कार्डधारक बिटकॉईनची खरेदी करू शकणार नाही. तसेच बँकेच्या प्रीपेड कार्डातूनही क्रिप्टो करन्सी खरेदी करू शकणार नाही. 

ई-मेलच्या माध्यमातून दिली माहिती...

क्रिप्टो करन्सीशिवाय बँकेने एचडीएफसीकडून जारी करण्यात येणाऱ्या प्रीपेड कार्डाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची व्हर्चुअल करेन्सीची खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे. ही माहिती बँकेच्या ग्राहकांना एका ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. बँकेने मेलमध्ये म्हटले आहे की, रिझर्व बँकेने देशातील नागरिकांना क्रिप्टो करन्सीच्या इकॉनॉमिक, ऑपरेशनल, लीगल आणि सिक्युरिटी संदर्भात जोखीम असल्याचे यापूर्वीच सूचीत केले आहे. 

सिटी बँकेनेही केली बंदी 

अशा प्रकारच्या ट्रान्सक्शनवर सिटी बँकेने बंदी घातली आहे. त्यामुळे सिटी बँकेच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डाने क्रिप्टो करन्सीची खरेदी करता येणार नाही.