अभ्यासात जिंकली पण आयुष्याची झुंज हरली! दहावीत 99.70 मिळवणाऱ्या हीरचा ब्रेन हेमरेजने मृत्यू

Heer 10th student:  ब्रेन हॅमरेजशी लढणारी हीर अखेर आयुष्याच्या लढाईत हरली. गुजरात बोर्डच्या टॉपर विद्यार्थीनीने डॉक्टर बनण्याचे स्वप्न तुटले. 

Pravin Dabholkar | Updated: May 17, 2024, 03:57 PM IST
अभ्यासात जिंकली पण आयुष्याची झुंज हरली! दहावीत 99.70 मिळवणाऱ्या हीरचा ब्रेन हेमरेजने मृत्यू  title=
Heer 10th Topper

Heer 10th student: अनेक विद्यार्थी अभ्यासात प्रचंड हुशार असतात पण अनेकदा शरीर, परिस्थितीती, नशिब त्यांना साथ देत नाही. 16 वर्षाच्या हीरला भविष्यात डॉक्टर बनायचं होतं. यासाठी तिने शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलं होतं. 11 मेला गुजरात बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये हीर टॉपर होती. तिला 99.70 टक्के मिळाले. बोर्डाच्या टॉपर्समध्ये तिचे नाव होते. तिला गणितामध्ये 100 आणि विज्ञानामध्ये 94 गुण मिळाले. पण निकाल आल्याच्या पाचव्या दिवशी ती आयुष्यासोबत झुंझत होती. ब्रेन हॅमरेजशी लढणारी हीर अखेर आयुष्याच्या लढाईत हरली. गुजरात बोर्डच्या टॉपर विद्यार्थीनीने डॉक्टर बनण्याचे स्वप्न तुटले. 

असे असले तरी हीरच्या परिवाराने धैर्य दाखवत उदाहरण समोर ठेवले आहे. त्यांनी हीरचे डोळे आणि शरीर दान करण्याचा निर्णय घेतला. 

हीरला दहावी बोर्डाच्या परीक्षेत 99.7 टक्के गुण मिळाल्याने घरी आनंदाचे वातावरण होते. पण मुलीच्या मृत्यूनंतर घरच्यांच्या पायाखालची जमिन सरकली. असे असतानाही त्यांनी एक कठीण निर्णय घेतला. आपल्या मुलीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न भलेही पूर्ण झाले नसेल तर तिच्या अवयवांमुळे एखाद्याला नवे आयुष्य मिळेल, या भावनेने हीरच्या घरच्यांनी महत्वाचा निर्णय घेतला. 

हीरचे डोळे ज्याला मिळतील त्या माध्यमातून हीर या जगात राहील,असे तिच्या घरच्यांना वाटते. बीटी सवानी रुग्णालयात हीरचा मृतदेह अवयवदानासाठी नेण्यात आला. त्यामुळे सर्व स्टाफच्या डोळ्यात पाणी होतं. 

हीरच्या परिवाराने घेतलेल्या निर्णयाचे सारेजण कौतुक करत आहेत. हीर नसल्याने तिच्या मित्र परिवारातही दु:खाचे वातावरण आहे. तर हीरचे शिक्षक तिच्या घरच्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत  करत आहेत. रुग्णालयात हीरच्या परिवारासमोर कोणालाही डोळ्यातील अश्रू थांबवणे शक्य झाले नाही.