Indian Railway: रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा का असतात, त्याचा अर्थ काय?

Indian Railway Coach facts: भारतीय रेल्वेने कात टाकली आहे. वाफेच्या इंजिनपासून ते डिझेल इंजिन आणि आता तर इलेक्ट्रिक इंजिनपर्यंतचा मोठा प्रवास भारतीय रेल्वेचा आहे. दरम्यान,  रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा का असतात, हे तुम्हाला माहित आहे का?

Surendra Gangan Updated: Dec 18, 2022, 03:04 PM IST
Indian Railway: रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा का असतात, त्याचा अर्थ काय? title=

Indian Railway News: जगातील सर्वात रेल्वेचे जाळे हे भारतात आहे. भारतीय रेल्वेला मोठा इतिहास आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रेल्वे वाहतूक हे आधुनिक साधनांपैकी एक आहे. 1951 मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. हे आशियातील सर्वात मोठे आणि त्याच व्यवस्थापनाखाली चालवले जाणारे जगातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. वाफेच्या इंजिनपासून ते डिझेल इंजिन आणि आता तर इलेक्ट्रिक इंजिनपर्यंतचा असा हा एक अद्भुत प्रवास आहे. रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा का असतात, याबद्दल जाणून घ्या.

भारतीय रेल्वेचे जाळे हे उत्तर - दक्षिण आणि पश्चिम - पूर्व असे जोडले गेले आहे. भारतीय रेल्वेमध्ये, अनेक गोष्टी सांगण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या चिन्हांचा वापर केला जातो, जसे की ट्रॅकच्या बाजूला चिन्हे, फलाटावरील चिन्हे इत्यादी. या सर्व बाबी लक्षात घेऊन रेल्वेच्या डब्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे चिन्ह वापरण्यात आले आहे.

निळ्या रंगाच्या ICF कोचमध्ये आणि कोचच्या शेवटी खिडकीच्या वर पिवळ्या किंवा पांढर्‍या रंगाच्या रेषा किंवा पट्ट्या मारलेल्या असतात किंवा लावलेल्या असतात. ज्याचा वापर कोचला इतर डब्यांपासून वेगळे करण्यासाठी केला जातो. या रेषा द्वितीय श्रेणीच्या अनारक्षित डब्यांचे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा एखादी रेल्वे स्टेशनवर येते तेव्हा सामान्य डब्याबद्दल अनेक लोक गोंधळलेले असतात, परंतु या पिवळ्या रेषा पाहून लोक सहजपणे समजू शकतात की हा जनरल कोच अर्थात सामान्य डबा  (General Coach) आहे. 

त्याचप्रमाणे निळ्या आणि लाल रंगावर पिवळे पट्टे हे अपंग आणि आजारी लोकांसाठीच्या डब्यावर वापरले जातात. त्याचप्रमाणे, राखाडीवरील हिरव्या रेषा सूचित करतात की, हा कोच फक्त महिलांसाठी राखीव आहे. या रंगाचे प्रकार केवळ मुंबई, पश्चिम रेल्वेमधील नवीन ऑटो डोअर क्लोजिंग ईएमयूसाठी समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, लाल रंगाचा पट्टा प्रथम श्रेणीच्या कोचसाठी दिलेला असतो. आता तर आपल्याला समजले आहे की, हे रंगीत पट्टे रेल्वेच्या डब्यावर का दिले जातात आणि ते काय सूचित करतात ते?

पिवळा पट्टा असतो कारण...

Indian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित

तुम्ही पाहिले असेल रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळ्या रंगाची पट्टी असते आणि ती पृष्ठभागावरुन थोडी उंच असते. याच्यामागे कारण आहे, दृष्टिहीन व्यक्तींच्या सुरक्षेसाठी. जेव्हा दृष्टिहीन व्यक्ती प्लॅटफार्मवरून चालत असताना रेल्वे रुळावर पडू नये म्हणून त्यांचासाठी हा इशारा असतो. जेणेकरुन ते कोणाचीही मदत न घेता सुरक्षेत अंतराने चालतात. 

आता प्लॅटफॉर्मवर पिवळा पट्टा का असतो या प्रश्नाचं  उत्तर जाणून घेऊयात. जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचणार असते, तेव्हा लोक ट्रेनमध्ये चढण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या जवळ एकच गर्दी करतात. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका असतो. जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर येते तेव्हा जोरदार वाऱ्याच्या दाबामुळे आपण ट्रेनकडे खेचले जातो. म्हणून रेल्वेकडून काळजी घेण्यात आली आहे.