मतदाराला दोन्ही हात नसतील तर मतदान करताना शाई कुठे लावतात?

Voting Ink mark for Physically Handicapped Voters : जर एखाद्या व्यक्तीला दोन्ही हात असतील तर मतदान करताना शाईची खुण कुठे केली जाते? तुम्हाला माहितीये का?

सौरभ तळेकर | Updated: May 20, 2024, 06:22 PM IST
मतदाराला दोन्ही हात नसतील तर मतदान करताना शाई कुठे लावतात? title=
Voting Ink mark for Physically Handicapped Voters

Ink mark during voting : सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. राज्यातील लोकसभेच्या (Loksabha Polling) पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. 2024 ची लोकसभा निवडणूक राज्यातील बदलेल्या राजकीय समीकरणांसोबतच अनेक मुद्द्यांमुळं गाजली. लोकांनी यंदाच्या निवडणुकीत कमी प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळतंय. रखरखतं ऊन आणि राज्यातील राजकीय गदारोळामुळे अनेकांनी मतदान केलं नाही. मात्र, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावायला पाहिजे. अशातच तरुणांनी यंदाच्या निवडणुकीत घराबाहेर पडून मतदान करुन तर्जनीवरची खूण (Ink mark) दाखवली अन् सोशल मीडियावर अपलोड केलीये. मात्र, जर मतदाराला दोन्ही हात नसतील (Physically Handicapped Voters) तर मतदानाच्या शाईची खून कुठे केली जाते? असा सवाल तुम्हालाही पडला असेल.

मतदान केंद्रावर ईव्हीएम बटण दाबण्यापूर्वी तेथे उपस्थित मतदान कर्मचाऱ्यांनी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाईची खूण केली जाते. मतदाराने आपला हक्क बजावल्याची ही खूण असते. पण जर मतदाराला डावा हात नसेल तर त्याच्या उजव्या हाताच्या बोटावर शाईची खूण केली जाते. पण जर दोन्ही हात असतील तर? यावर उत्तर देणारा एक फोटो निवडणूक आयोगाने शेअर केला होता.

इंदूर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने मतदानाच्या दिवशीचा एक फोटो शेअर केला अन् उत्तर दिलं. जर एखाद्या व्यक्तीला दोन्ही हात नसतील तर मतदान केंद्रावर अशा व्यक्तीच्या उजव्या पायाच्या बोटाला शाई लावली जाते. इंदूर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये पायाला शाई लावणारी व्यक्ती म्हणजे विक्रम अग्निहोत्री. निवडणूक आयोगाने त्यांना दिव्यांग ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मतदानाचा हक्क बजावला.

विक्रम अग्निहोत्री यांनी पायाने मतदान करून एक अनोखा आदर्श ठेवला आहे. लोकांनी मतदान करावं यासाठी  निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

दरम्यान, राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडलं.. मुंबई आणि उपनगरातील मतदारसंघांमध्येही मदतान पार पडलं.. मात्र संथ गतीने मतदान प्रक्रीया सुरू असल्यामुळे मतदारांना तासंतास रांगेत ताटकळावं लागलं. मात्र, नागरिकांनी रांगेत प्रतिक्षा करून मतदानाचा अधिकार बजावला आहे.