पीएनबी घोटाळ्यानंतर RBIचे मोठे पाऊल... आता जारी करणार नाही एलओयू

  अब्जावधीचा पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर केंद्रीय रिझर्व बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे.  या अंतर्गत बँकाकडून आयतीसाठी देण्यात येणारे गॅरंटी पत्र (लेटर ऑफ अंडरटेकिंग) आणि लेटर ऑफ कम्फर्ट (एलओसी) जारी करण्याची सुविधा तात्काळ थांबविण्यात आली आहे.  बँकांशी होणाऱ्या फसवणूकीमुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 13, 2018, 08:01 PM IST
पीएनबी घोटाळ्यानंतर RBIचे मोठे पाऊल... आता जारी करणार नाही एलओयू title=

नवी दिल्ली :  अब्जावधीचा पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर केंद्रीय रिझर्व बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे.  या अंतर्गत बँकाकडून आयतीसाठी देण्यात येणारे गॅरंटी पत्र (लेटर ऑफ अंडरटेकिंग) आणि लेटर ऑफ कम्फर्ट (एलओसी) जारी करण्याची सुविधा तात्काळ थांबविण्यात आली आहे.  बँकांशी होणाऱ्या फसवणूकीमुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी पीएनबीचा १२६०० कोटी रूपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी आरोपी आहेत. 

५० कोटी पेक्षा अधिक कर्जासाठी पासपोर्ट गरजेचे 

ईडी आणि सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत समोर आले की नीरव मोदीने इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळा हा एलओयूच्या माध्यमातून केला होता. या पूर्वी अर्थमंत्रालयाने बँकांशी संबधीत कोणत्याही मोठ्या फ्रॉडला वाचविण्यासाठी ५० कोटीपेक्षा अधिक कर्ज घेताना पासपोर्ट संबंधी सर्व माहिती देणे गरजेचे केले आहे. कोणताही गैरव्यवहार झाल्यास त्वरित कारवाई व्हावी यासाठी ही माहिती असणे गरजेचे असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.