प्रेमाचं प्रतीक अशी ओळख असणारा आग्रा येथील ताजमहाल पाहताक्षणी नजरेत भरतो. ही वास्तू मुघल शासक शहाजहांनं त्याची बेगम मुमताज महलच्या नावे उभारल्याचं म्हटलं जातं.
असं म्हणतात की मुमताज किंवा अर्जुमंद बानो बेगम ही शहाजहांची सर्वात प्रिय पत्नी होती.
14 बाळाच्या जन्मावेळी मुमताजचं निधन झालं. प्रत्यक्षात मुमताजशिवायही शहाजहांच्या इतरही बेगम होत्या. ताजमहलमध्येही मुमताजसह त्याच्या तीन बेगमची थडगी असल्याचं सांगितलं जातं. इथं मुख्य घुमटाखाली मुमताज दफन आहे.
ताजमहलच्या पूर्व द्वाराकडे सरहिंदी बेगमचा मकबरा आहे. मुघल शासनकाळात शहाजहांच्या या बेगमनं महत्त्वाची भूमिका निभावली होती.
कंन्दहारी किंवा कंधारी बेगम ही शहाजहांची पहिली पत्नी होती. ती फारसची राजकुमारी असून, तिचा जन्म अफगाणिस्तानातील कंधार इथं झाला होता. शहाजहांची ही बेगम अतिशय 'रुहानी' असल्यानं ती महलापासून दूरच असायची.
मुमताशिवाय अकबराबादी महलहीसुद्धा शहाजहांची बेगम होती. इज़्ज़ उन निस्सा बेगम या नावानंही त्यांना ओळखलं जातं.