'पुष्पा' च्या गाण्यावर रील बनवलं अन् चमकलं नशिब; मिळाला अल्लू अर्जुनचा चित्रपट

Diksha Patil
Dec 14,2024


'पुष्पा 2' मध्ये ज्या अभिनेत्रीनं हमीदच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली त्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? या अभिनेत्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं.


चित्रपटात हमीदच्या गर्लफ्रेंडची भूमिका आंचल मुंजालनं साकारली होती. कोण आहे ही आंचल मुंजाल जाणून घेऊया...


आंचलनं एका मुलाखती दरम्यान, खुलासा केला की जेव्हा 'पुष्पा' चित्रपटातील पुष्पाराज गाणं प्रदर्शित झालं तेव्हाच 'पुष्पा 2' या चित्रपटाची ऑफर मिळाली होती.


गाण्यावर तिनं अगदी साधारण रील बनवलं होतं. जे खूप व्हायरल झालं होतं.


तिचं हे रील पुष्पाच्या टीमनं पाहिलं आणि तिला कॉल करत चित्रपटासाठी ऑफर दिली.


आंचल मुंजाल आधी छोट्या पडद्यावरील एका शोमध्ये दिसली होती.

VIEW ALL

Read Next Story