कडुलिंबाची पाने खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने आणि गुळ खायला दिलं जातं. कडवट आठवणी विसरून नव्या वर्षात गोड खाऊन नव्या वर्षाचं आनंदाने स्वागत केलं जातं.

याला धार्मिक जसं कारण आहे तसंच वैज्ञानिक कारणही आहे. कडवट असली तरी आयुर्वेदात कडुलिंबाची पानं खाणं शरीरासाठी गुणकारी मानलं जातं. जाणून घेऊयात कडू निंबाची पानं खाणं शरीराला का फायदेशीर असतं.

कडुलिंबाच्या पानांमध्ये पोषण तत्वं मोठ्या प्रमाणात आढळतात. रोज सकाळी उपाशी पोटी ही पानं खाल्याने त्वचेवरील पिंपल्स दूर होतात. त्याशिवाय त्वचेचं आरोग्य सुधारण्यास कडुलिंबाची पानं खाणं फायदेशीर ठरतं.

जर तुम्हाला रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची असल्यास कडुलिंबाची पानं खाणं रामबाण उपाय आहे. रोज तीन ते चार कडुलिंबाची पानं खाल्याने शरीराला आवश्यक पोषणतत्त्व मिळतात.

अपचनाचा त्रास होत असल्यास रोज कडूनिंबाची पानं खाल्याने आम्लपित्त जळजळ होण्याचा त्रास दूर होतो. रोज कडुलिंबाच्या पानांचं सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते.

उल्टीच्या त्रासावर कडुलिंबाची पानं गुणकारी आहेत. उल्टीमुळे तोंडाची दुर्गंधी वाढते. कडुलिंबाची पानं खाल्याने किंवा कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने तोंडाची दूर्गंधी कमी होते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी कडुलिंबाची आरोग्यवर्धक आहेत. नजर कमी होणं आणि जास्त नंबरचा चष्मा असल्यास रोज कडुलिंबाची पानं खाल्याने डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.

संवेदनशील त्वचा असलेल्यांना खाण्यात काही आल्यावर त्वचेवर पुरळ येणं , लाल चट्टे येणं अशा प्रकारची अ‍ॅलर्जी होण्याचा त्रास वारंवार जाणवतो. कडुलिंबाची पानं रोज खाल्याने तसंच कडुलिंबाच्या पानांची पेस्ट त्वचेवर लावल्याने अ‍ॅलर्जी कमी होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story