गरम पाण्याने कपडे धुणे हा कपडे स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग मानला जातो.
पण काही कपडे हे गरम पाण्याने धुतल्यास त्यांचे कापड आणि त्याची गुणवत्ता खराब होऊ शकते. तेव्हा कोणते कपडे गरम पाण्याने अजिबात धुवू नयेत याबद्दल जाणून घेऊयात.
पॉलिस्टर आणि सिंथेटिक कापड हे जरी टिकाऊ असलं तरी गरम पाण्यात धुतल्याने त्यावर डाग येऊ शकतात. एम्ब्रॉयडेड असलेले कपडे सुद्धा गरम पाण्याने धुणे टाळावे.
रेशीम आणि लोकर हे कपडे नैसर्गिक धाग्यांपासून बनलेले असतात. असे कपडे जर गरम पाण्याच्या संपर्कात आले तर ते आकुंचन पावतील. तसेच रेशमी कपड्यांवर असलेली चमक गरम पाण्यान धुतल्याने खराब होऊ शकते.
इलास्टिक किंवा स्पॅन्डेक्स असलेले कपडे गरम पाण्याने धुवू नका. गरम पाण्यामुळे या कपड्यातील लवचिक तंतू तुटतात ज्यामुळे लेगिंग्ज, स्पोर्ट्स ब्रा आणि स्विमसूट यांसारख्या कपड्यांचा आकार बदलतो.
डेनिम कपड्यांपासून बनलेले जीन्स पँट्स, जॅकेट इत्यादी थंड पाण्यात धुतल्याने त्याचा रंग आणि चमक नव्या सारखी राहते. पण गरम पाण्याने हे कपडे धुतल्यामुळे त्याचा रंग फिकट होत जातो.
अंतर वस्त्र हलक्या कपड्याचा वापर करून बनवले जातात. त्यामुळे अंतर वस्त्र गरम पाण्याने धुतल्यास लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे यासाठी थंड पाण्याचाच वापर करावा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)