व्हिटामिन -डी आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्याचे काही मेटाबॉलिक फायदे आहेत.
व्हिटामिन-डी आपल्या हाडांना मजबूत करतं आणि ऑस्टियोपोरोसिस आणि रिकेट्ससारख्या हाडांच्या संबंधीत आजारांना थांबवतो.
व्हिटामिन-डी इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे कोणत्याही संक्रमणापासून आपण वाचून राहू शकतो.
मसल्स फंक्शनचं काम आणि त्यांना मजबूत करण्यासाठी व्हिटामिन डी खूप महत्त्वाचं असतं. वृद्धांना व्हिटामिन-डीची खूप गरज असते.
व्हिटामिन-डी जर योग्य प्रमाणात असेल तर तुमचं वजन हे नियंत्रणात राहतं. यामुळे लठ्ठपणा होण्याची शक्यता कमी होते.
व्हिटामिन-डीमध्ये सेरोटोनिन न्यूरोट्रान्समीटर वाढवतं, त्यामुळे तुमता मूड चांगला राहतो आणि डिप्रेशन किंवा एग्झायटी सारख्या समस्या होत नाहीत. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)