अनेक लोकांना छोट-छोट्या गोष्टींवरून लगेच राग येतो.
याच रागाचा शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
प्रचंड राग आल्याने हृदयविकाराचा धोका देखील वाढण्याची शक्यता असते.
त्यामुळे राग आल्यास लगेच डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या आणि सोडा.
राग आल्यास आनंद देणाऱ्या गोष्टींचा विचार करा किंवा स्ट्रेस बॉलच्या मदतीने तो शांत करा.
जर तुम्हाला ऑफिसमधील कामांमुळे तणाव येत असेल तर काही वेळ ब्रेक घेऊन फिरायला जा.