व्यक्तीच्या उठण्याबसण्यापासून अगदी त्या व्यक्तीच्या चालण्याच्या अंदाजातूनही त्याच्या व्यक्तीमत्त्वाविषयी अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो.
चालताना जर तुम्ही शरीराचा भार पुढे टाकत पटापट चालत आहात तर, तुम्ही प्रचंड प्रोडक्टीव्ह आणि अत्याधिक तर्किक व्यक्ती आहात.
छाती पुढे काढून खांदे मागे झुकवून चालण्याची सवय असणाऱ्या व्यक्ती एक कमाल व्यक्तीमत्त्वं असून, समाजात लोकप्रिय असतात. ही मंडळी कायम चर्चेत असतात.
शरीराच्या पुढच्या किंवा मागच्या बाजूला भार न टाकता पायांवर शरीराचा भार पेलत चालणाऱ्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत प्रचंड उत्साही असतात.
ही मंडळी करिअरच्या तुलनेत खासगी जीवनात अधिक यशस्वी ठरतात. त्यांचं लक्ष मात्र अनेकदा विचलित होतं.
चालताना पायांच्या बोटांवर हलका भार टाकणाऱ्या व्यक्ती विनम्र आणि एकट्यातच रमणारी असतात.