येमेन हा जगातील एकमेव देश असून ज्याचं नाव हे इंग्रजी वर्णमालेच्या 'Y'या अक्षरावरून सुरु होतं. येमेन हा नैसर्गिक सौंदर्य आणि इतिहासाने समृद्ध असलेला देश आहे.
येमेन या देशात काही मनोरंजक आणि अद्वितीय आकर्षण आहेत जी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.
येमेन हा लाल समुद्र आणि ईडनच्या आखातावर वसलेला देश असून याच्या उत्तरेला सौदी अरेबिया आणि पूर्वेला ओमान देशाच्या सीमा आहेत.
येमेन या देशाची लोकसंख्या सुमारे 30 दशलक्ष इतकी असून हा देश प्राचीन शहरं आणि युनेस्को आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा अनेक पुरातत्व अभ्यासक या देशाला भेट देतात.
येमेन या देशात सोकोत्रा बेट असून हे जगातील सर्वात अद्वितीय आकर्षणांपैकी एक आहे. या बेटावर आयकॉनिक ड्रॅगन ब्लड ट्री आहेत.
साना ही येमेन देशाची राजधानी आहे. राजधानी सानाच्या जुन्या शहरांमध्ये प्राचीन घरं, जुन्या मशिदी आणि अरुंद गल्ल्या असून ते येमेनच्या संस्कृतीची झलक दाखवतात.
येमेन देशातील अल हुदायदाह हे लाल समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. हे बंदर सुंदर समुद्रकिनारे आणि प्राचीन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच हे अरबी द्वीपकल्पातील सर्वात जुने बंदर आहे.