समस्या दूर करण्यासाठी

बुधवारी तुमच्या आई-वडिलांच्या चरणांना स्पर्श करा आणि त्यांना आवश्यक काहीतरी अर्पण करा. यासोबतच पान-सुपारी गणपतीच्या चरणी अर्पण केली जाते. यामुळे समस्येतून मार्ग निघेल.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

कामाच्या ठिकाणी संबंध चांगले ठेवण्यासाठी

बुधवारी स्नान गणपतीची पूजा करावी. यानंतर ‘श्री गणेशाय नमः’ मंत्राचा 21 वेळा जप करावा.

घरावर वाईट नजर असल्यास

तुमच्या घरावर किंवा कुटुंबावर वाईट नजर असल्यास तुम्ही बुधवारी मोहरी घ्या आणि घराच्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी त्या बिया उचलून पिंपळाच्या झाडाखाली टाका. असे केल्याने नकारात्मक शक्ती निघून जातात.

परीक्षेत यश मिळवण्यासाठी

नोकरीसाठी मुलाखत किंवा स्पर्धा परीक्षा देणार असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी लवंग आणि सुपारी ठेऊन गणपतीची आरती करा.

घरात वाद होतात?

2 बासरी घ्या आणि त्या तुमच्या घराच्या बीमच्या दोन्ही बाजूला लाल कापडाने बांधा. हे करताना लक्षात ठेवा की त्या बासरींचे तोंड तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाकडे असावे. असे केल्याने कौटुंबिक संबंध सुधारू लागतात.

गणराया प्रसन्न करा

या दिवशी शुभ कार्यात यश मिळवण्यासाठी सुपारीचे उपाय करून श्रीगणेश प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.

आज शुभ योग

आज सकाळी 8 वाजता 7 मिनिटांनी सुकर्म योग आहे. त्यानंतर धृती योग सुरू होईल. ज्योतिषांनुसार या योगामध्ये केलेले कार्य नेहमीच शुभ आणि फलदायी ठरतात.

Wednesday Upay: आर्थिक स्थिती मजबूत करायची आहे? आज करा पान सुपारीचे हे उपाय

VIEW ALL

Read Next Story