जगभरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांनी मानव, निसर्ग आणि विज्ञान यांना देखील आश्चर्यचकित केले आहे.
अशा अनेक ठिकाणे आहेत जिथे अनोख्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे ती ठिकाणे देखील चर्चेत राहतात.
असेच एक ठिकाण जॉर्डन आणि इस्त्रायल यांच्यामध्ये आहे. येथे एक समुद्र आहे ज्याचे नाव Dead Sea आहे.
Dead Sea समुद्राचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे येथे येणारा कोणताही व्यक्ती इच्छा असूनही बुडू शकत नाही. यामागचे कारण खूपच आश्चर्यकारक आहे. जे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
कारण या समुद्राच्या पाण्यात क्षार जास्त असल्यामुळे तिथे मिठाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्ही त्यावर सहज झोपू शकता.
जर तुम्हाला पोहता येत नसले तरी तुम्ही या समुद्रात बुडू शकत नाही. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)