Surya Kumar Yadav : टीम इंडियाच्या Mr 360° बद्दल जाणून घ्या, सूर्यकुमार यादवच्या कुटुंबाचे Unseen Photo

Surya Kumar Yadav Family and Biography : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकलीत. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अवघ्या 45 चेंडूत नाबाद शतक झळकावलं. आपल्या खेळीत सूर्याने चौफेर फलंदाजी केली. यासाठी त्याला Mr 360° म्हटलं जातं. अवघ्या 45 टी20 सामन्यात सूर्याने तब्बल 3 शतकं आणि 13 अर्धशतकं झळकावली आहेत. धावांबरोबरच सूर्याच्या चाहत्यांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल घेण्याची उत्सुकता सर्वांना आहे. 

Jan 07, 2023, 21:20 PM IST
1/6

सूर्यकुमार यादवाच जन्म 14 सप्टेंबर 1990 मध्ये मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्याला क्रिकेट आणि बॅडमिंटनचा खेळण्याची आवड होती. पुढे क्रिकेट खेळातच त्याने आपली कारकिर्द बनवली.

2/6

सूर्यकुमार यादवचं शालेय शिक्षण मुंबईतल्या परमाणू उर्जा केंद्रीय विद्यालायत झालं तर महाविद्यालयीन शिक्षण पिल्लई कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयता झालं. सूर्याने बीकॉमची पदवी घेतली आहे. 

3/6

सूर्यकुमारचे वडिल अशोक कुमार यादव बीएआरसीमध्ये अभियंता होते. तर सूर्याच्या आईचं नाव स्वप्ना यादव आहे. सूर्याला लहानपणापासूनच अंगावर टॅटू गोंदण्याची खूप आवड होती. एका हातावर त्याने चक्क आपल्या आई-वडिलांचा टॅटू गोंदवला आहे. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा आहे. 

4/6

क्रिकेटची आवड असलेल्या सूर्याचे काका विनोद कुमार यादव हे सूर्याचे पहिले कोच होते. त्यांनीच सूर्याला क्रिकेटचं प्राथमिक मार्गदर्शन केलं.

5/6

सूर्यकुमार यादवचं लग्न 7 जुलै 2016 ला झालं. त्याच्या पत्नीचं नाव देविशा शेट्टी असं असून ती डान्स कोच आहे. 

6/6

सूर्यकुमार आणि देविशाची 2012 मध्ये पहिली ओळख झाली. मुंबईतल्या पोदार कॉलेजमध्ये दोघांची भेट झाली. त्यानंतर चार वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.