Year: 
2014
Year Section: 
Entertainment
Slideshow Data: 
Year Ender Title: 
फेसबुक आणि ट्विटरचा प्रचंड परिणाम
Image: 
Caption: 

फेसबुक आणि ट्विटर प्रचंड परिणाम

सोशल मीडियाचा २०१४मध्ये प्रचंड परिणाम जाणवला. सेलिब्रिटी आणि त्यांचे प्रेक्षक यांच्यामधील तर फेसबुक आणि ट्विटर हा दुवाच ठरलाय. 

आता आपल्या प्रत्येक चित्रपटाबाबत गाणं, त्याचा प्रोमो, फोटो, इव्हेंट प्रत्येक गोष्टीची सेलिब्रिटी प्रेक्षकांना ट्विटरवरून माहिती देतात. दोन बाबींमधील गॅप भरून काढणारं हे एक महत्त्वाचं माध्यम बनलंय. 

सोशल मीडियाचे सेलिब्रिटींच्या आयुष्यावर दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह परिणाम पाहायला मिळतात. 

२०१४ वर्ष संपता-संपता अशाच काही घटनांविषयी जाणून घेऊया ज्यांनी सोशल मीडियावरून चळवळ चालवली. मग यात राजकारणी आणि सेलिब्रिटी दोघांचाही समावेश आहे. 

 

Year Ender Title: 
सोशल मीडियावर सेलिब्रिटींवरील जोक्सचा धुमाकुळ
Image: 
Caption: 

सोशल मीडियावर सेलिब्रिटींवरील जोक्सचा धुमाकुळ

ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ अर्थात बाबुजींच्या जोक्सनं सोशल मीडियावर धमाल उडवून दिली. आलोकनाथ यांच्यापासून सुरू झालेली ही पद्धत आलिया भट्ट, निल नितीन मुकेश, टायगर श्रॉफ, यामी गौतम, उदय चोप्रा, निरूपा रॉय यांच्यावरील जोक्सनं सोशल मीडियाचं नवं रूपच समोर आणलं. या जोक्समुळं ट्विटर आणि फेसबुकवर नव्या लेखकांची जणू फौजच तयार झाली. 

 

Year Ender Title: 
हृतिकची बँग बँग डेअर #BANGBANGDARE
Image: 
Caption: 

हृतिकची बँग बँग डेअर #BANGBANGDARE

फिल्मच्या प्रमोशनसाठी अभिनेता हृतिक रोशननं चांगलीच ट्रीक वापरली. आपल्या बॉलिवूडच्या सहकाऱ्यांना त्यानं बँग बँग डेअर चॅलेंज करायला नॉमिनेट केलं... एक-एक डेअर सांगितली. त्याच्या मित्रांनीही ती स्वीकारत अनेकांनी ते चॅलेंज पूर्णही केलं. 

 

Year Ender Title: 
पंतप्रधान मोदींचं 'स्वच्छ भारत अभियान'!
Image: 
Caption: 

पंतप्रधान मोदींचं 'स्वच्छ भारत अभियान'!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरुणांचे आणि सेलिब्रिटींचे आयकॉन बनलेत. त्यांनी भारतासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आणि त्यात सेलिब्रिटींसह सर्व भारतीयांना सामावून घेतलं.

सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करत सेलिब्रिटींनी स्वच्छ भारत अभियानात सहभागी घेऊन त्याचा व्हिडिओ ट्विटरवर टाकला आणि ती साखळी सुरू केली. या अभियानात प्रत्येक सेलिब्रिटीनं आपल्या अनेक नऊ सहकाऱ्यांना नॉमिनेट केलं. 

पंतप्रधानांनी प्रसिद्ध टिव्ही शो 'तारक मेहता का उलटा चष्मा'च्या टीमला स्वच्छ भारत अभियानात आणत त्यांना आणखी नऊ जणांना नॉमिनेट करायला सांगितलं. 

या अभियानात आतापर्यंत प्रियंका चोप्रा, सलमान खान, कमल हसन, अनिल अंबानी, शशी थरूर, ओमर अब्दुल्ला यांच्यासह सचिन तेंडुलकर, विराट कोहली सारख्या क्रिकेर्टसनीही सहभाग घेतला. 

 

 

Year Ender Title: 
जगात 'आइस बकेट चॅलेंज'ची धूम
Image: 
Caption: 

जगात 'आइस बकेट चॅलेंज'ची धूम

जगाला  amyotrophic lateral sclerosis (ALS) या आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी 'आइस बकेट चॅलेंज' सुरू केलं. या चॅलेंजमध्ये बर्फ आपल्या डोक्यावर टाकण्याचं चॅलेंज देण्यात आलं होतं. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी २४ तासांचा वेळ देऊन इतर लोकांना नॉमिनेट करायचं होतं. जर हे चॅलेंज पूर्ण नॉमिनेट केलेल्या वक्तव्यानं पूर्ण केलं नाही तर त्यांना आजारासाठी रिसर्चला फंड द्यावं लागणार, असं हे चॅलेंज होतं. जुलै-ऑगस्टमध्ये हे चॅलेंज सोशल मीडियावर जबरदस्त  हिट झालं होतं. 
 

 

Year Ender Title: 
भारताचं उत्तर 'राइस बकेट चॅलेंज'नं!
Image: 
Caption: 

भारताचं उत्तर 'राइस बकेट चॅलेंज'नं!

सोशल मीडियावर हीट झालेल्या आइस बकेट चॅलेंजला भारतानं राइस बकेट चॅलेंजनं उत्तर दिलं. हैदराबादच्या मंजुलता कलानिधी यांच्या डोक्यातून ही आयडिया आली. भारतातील गरीब आणि गरजूंना धान्य दान करण्याची. त्याचं नाव ठेवलं गेलं राइस बकेट चॅलेंज. या चॅलेंजलाही सोशल मीडियामुळं चांगलीच प्रसिद्धी मिळाली. बॉलिवूड निर्माता करण जोहरसह अनेकांनी यात भाग घेत धान्यानं भरलेल्या बकेट गरीबांना दान केल्या. 

 

Year Ender Title: 
खाजगी आयुष्यातील बातम्यांसाठी वापर
Image: 
Caption: 

जिथं अनेक सेलिब्रिटीनं आपलं खाजगी आयुष्य बंदिस्त ठेवलं, तिथं अनेकांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक बाबत सोशल मीडियावर शेअर केली. दिया मिर्झा आणि इलियाना डिक्रुझ या अशा दोन सेलिब्रिटीज ज्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनेची घोषणा ट्विटरवर केली. दिया मिर्झानं साहिल सांगासोबत आपल्या साखरपुड्याची घोषणा तर इलियानानं आपल्या परदेशी बॉय फ्रेंड विषयीची माहिती ट्वीट करून दिली. 

मराठमोळा पण बॉलिवूडचा हिरो रितेश देशमुखनं आपल्या बाळाच्या जन्माची बातमीही ट्विटरवरूनच दिली. 

तर काहींनी आपलं नातं तुटल्याचंही ट्विटरवरून सांगितलं. अरमान कोहलीनं आपण तनिषा मुखर्जीसोबत जास्त रिलेशनशीप वाढवू शकत नसल्याचं ट्वीट केलं. तर गौहर खाननंही कुशाल टंडनसोबत तिच्या नात्यातील दुरावा ट्विटरवरून मांडला. 

 

Year Ender Title: 
ट्विटरच्या माध्यमातून आवाज उचलला
Image: 
Caption: 

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'हॅपी न्यू इअर' रिलीज होण्यापूर्वीच एक वाद उफाळून आला. एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं दीपिकाच्या फोटोबद्दल दिलेल्या कॅप्शनवरून ती चांगलीच भडकली आणि तिनं आपलं मत मांडण्यासाठी ट्विटरचा वापर केला. 

तसंच अभिनेता हृतिक रोशन आणि अर्जुन रामपाल यांनीही ट्विटरवरून माध्यमांमध्ये त्यांच्या खाजगी आयुष्यातील बातम्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. 

बिग बी अमिताभ बच्चन हे ट्विटर आणि फेसबुकवर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या तब्येतीबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत बिग बींनी ट्विटरवरून लोकांची चांगलीच कान उघाडणी केली.   

 

Year Ender Title: 
फेसबुक, ट्विटर फिल्म प्रमोशनचा न्यू फंडा
Image: 
Caption: 

अभिनेते आणि चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांसाठी सोशल मीडिया फिल्म प्रमोशनसाठी मोठा प्लॅटफॉर्म ठरतोय. प्रत्येक जण आपल्या न्यू प्रोजेक्टविषयी, चित्रपटांविषयी सोशल मीडियावरून प्रमोशन करतोय.

'हॅपी न्यू इअर','किक','पीके', 'अॅक्शन जॅक्शन','द शौकिन्स' या चित्रपटांसारखे उदाहरण पाहता येईल. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स अॅपवरून 'हॅपी न्यू इअर' आणि 'पीके'चे पोस्टर आणि टिझरही प्रसिद्ध केले गेले. 

 

 

Year Ender Title: 
सेल्फीच्या वेडानं यंदा सर्वांना पछाडलं
Image: 
Caption: 

'सेल्फी'च्या वेडानं यंदा सामान्यांनाच नाही तर सेलिब्रिटीजनाही पछाडलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अॅबॉट, सोनम कपूर ते अर्जुन कपूर, शाहीद कपूर ते अनुष्का शर्मा अनेक सेलिब्रिटीजनी असंख्य सेल्फीज ट्विटरवर पोस्ट केले. 

सेल्फीनंतर आलं ग्रुपी...  Ellen DeGeneres यांनी तर ग्रुपी अॅट द अॅकॅडमी अॅवॉर्ड घोषित केले. 

शाहीद कपूरनं तर पुढचं पाऊल टाकत इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अॅवॉर्ड्सला गेले असता सर्व बॉलिवूड स्टार्सचेच ग्रुपी काढण्याची फॅशन सुरू केली.  

 

English Title: 
The massive impact of Social Media