Ashadhi Wari 2023 :  वारकऱ्यांना विठूरायाच्या भेटीची ओढ लागली आहे. आषाढी वारीची जोरदार तयारी सुरु आहे. लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सरकारच्या आरोग्य खात्याने विशेष संकल्प आखला आहे. आषाढी वारीत  20 लाख वारकऱ्यांची आरोग्य तपासणी होणार आहे. या वारी निमित्ताने महा आरोग्य शिबीराचे आजोयन केले जणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. 


राज्य महिला आयोगाचीही आरोग्य आणि सुरक्षा वारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपूरच्या आषाढी वारीत आता राज्य महिला आयोगाचीही आरोग्य आणि सुरक्षा वारी असणार आहे. वारीमध्ये सहभागी होणा-या महिला वारक-यांच्या आरोग्याची तसंच सुरक्षेची काळजी महिला आयोग घेणार आहे.. पुण्याच्या निवडुंगा विठोबा मंदिरापासून या वारीला सुरुवात होईल.


यंदाच्या आषाढी यात्रेत राज्य शासनातर्फे महाआरोग्य शिबीर आयोजीत केले जाणार आहे.  20 लाख वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी या संकल्पनेवर आरोग्य विभागातर्फे हे शिबिर आयोजीत केले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. 28 आणि 29 जून रोजी पंढरपुरात हे महाआरोग्य शिबीर घेतले जाणार आहे. हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागविण्यात येणार आहेत.


पंढरपुरात तीन ठिकाणी हे आरोग्य शिबिर घेतले जाणार आहे. यामध्ये आरोग्य यंत्रणेसह, सकस आहार देखील वारकरी भक्तांना दिला जाणार आहे. याबाबत आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. आषाढी यात्रेमध्ये राज्य शासनाचे विविध कार्यक्रम आजपर्यंत राबवले गेले. मात्र, आरोग्य शिबिरसारखा लोकोपयोगी उपक्रम प्रथमच पंढरपूर येथे घेतला जात असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. 


इंद्रायणी नदीत स्नान करणा-या वारक-यांचं आरोग्य धोक्यात


आळंदीतील इंद्रायणी नदीचे पात्र पुन्हा  फेसाळल आहे.नदीत केमिकल सोडल्याने पाणी दुषीत झाले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान येत्या 11 तारखेला होणार आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीत स्नान करणा-या वारक-यांचं आरोग्य धोक्यात आले आहे.