चेतन कोळस,  झी मीडिया, नाशिक : सिन्नरच्या दातली गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण पार पडले. जेसीबीच्या साह्याने यावेळी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. नाशिकच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा रिंगण सोहळा होता. ड्रोनच्या माध्यमातून पालखीचे अप्रतिम दृश्य टिपण्यात आले (Ashadhi Padharpur Wari 2023).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी दिंडी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान सुरू झाले. सिन्नर शहरातून दातली शिवारात पालखी येताच जेसीबीच्या साह्याने पुष्पृष्टी करत खंबाळे रस्त्यावरील मैदानात या पालखीचे पहिले गोल रिंगण संपन्न झाले.  यात 43 दिंड्या सहभागी झाल्या असून 15 ते 20 हजार वारकरी या पालखी दिंडीत सहभागी आहे.


वारकरी विठू नामाच्या जगराज दंग


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर येथे निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण सिन्नरच्या दातली येथे संपन्न झाले. यावेळी भर उन्हात देखील गोल रिंगणात सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, विणेकरी क्रमानुसार गोलाकार उभे राहुन विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या तालात आणि एकाच लयीत पदन्यास करीत वारकरी नाचू लागले होते. या तालातच भरधाव दिंडी सोहळ्यातील अश्व गोलाकार प्रदक्षिणा करीत पालखीला अभिवादन केले. टाळ-मृदुंगाचा आलाप, विठूनमाचा जयजयकार आणि वेगाने धावणारे अश्व हे सारे विलोभनीय दृश्य बघण्यास मिळाले. रिंगणात मनसोक्त नाचणारे वारकरी आपला थकवा विसरून गेलेले असतात. पुढच्या प्रवासासाठी त्यांना रिंगणातून ऊर्जा मिळते.


मानाचा अश्व देहूकडे रवाना 


संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाचा अश्व देहूकडे रवाना झालाय. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातल्या बाभुळगावचे पालखी सोहळ्याचे चोपदार हभप निवृत्ती महाराज गिराम यांचा हा देवाचा अश्व आहे. हा मानाचा अश्व पालखी सोहळ्यामध्ये सामील होत रिंगणात धावणार आहे.  


देहूतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कमानीचं काम अंतिम टप्प्यात


देहूतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कमानीचं काम अंतिम टप्प्यात आले आहे.तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला अवघे 3 दिवस बाकी आहेत. त्यामुळे तयारीही जोरदार सुरू आहे. कमानीच्या रंगरंगोटीचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू केले. देहूरोड लष्करी हद्दीत असलेल्या या  आकर्षक प्रवेशद्वाराचं काम लवकरच पुर्ण होणार आहे.