मुंबई :  राजकीय नेत्यांच्या हत्या जगासाठी नवीन नाहीत. भारतही याला अपवाद नाही. यंदा भारताचा ७१वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. याचाच अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या काळात भारताने खूप मोठा संघर्ष पाहिला. जो आजही सुरूच आहे. यात अनेक नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ले तसेच, देश म्हणून निर्णय घेताना झालेल्या ऐतिहासिक चुका वैगेरेंचा समावेश आहे. पण, या सगळ्यात राजकीय नेत्यांच्या झालेल्या हत्या या अधिक चटका लावणाऱ्या ठरल्या. ज्यामुळे भारतात मोठी खळबळ उडाली.  आंतरराष्ट्रीय पातळीवरही या हत्यांची मोठी चर्चा झाली. हत्या झालोल्या या राजकीय व्यक्तिमत्वांचा स्वतंत्र्य दिनानिमित्त घेतलेला हा आढावा.


 


महात्मा गांधी


महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्यपूर्व भारताचा आणि त्यानंतर स्वतंत्र भारताचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाते. 30 जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची दिल्ली येथील बिरला हाऊस येथे हत्या झाली. ही हत्या नथूराम गोडसे नावाच्या व्यक्तीने केली होती.


 पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह कैरो 


 पंजाब राज्याचे शक्तीमान मुख्यमंत्री अशी ओळख असलेल्या प्रताप सिंह कैरो यांची 1965 मध्ये रोहतक इथे हत्या करण्यात आली. व्यक्तिगत कारणातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात आले. कैरो यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली.


ललित नारायण मिश्रा


ललित नरायण मिश्रा हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १९७५च्या मंत्रिमंडळात ताकदवान मंत्री होते. समस्तीपूर येथे त्यांची रहस्यमयरित्या हत्या करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या हत्येचा विदेशातून रचलेला कट असा उल्लेख केला होता. मिश्रा हे 1973 ते 1975 या कालावधीत रेल्वेमंत्री होते.


इंदिरा गांधी


महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर भारतात झालेली ही सर्वात मोठी हत्या होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येला पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळ कारणीभूत ठरली. त्या भारताच्या तीसऱ्या पंतप्रधान होत्या. १९६६ ते १९७७ पर्यंत आणि १९८० ते १९८४ या कालावधीत त्या सत्तेवर राहिल्या.  ३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये त्यांच्याच अंगरक्षांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.


राजीव गांधी 


राजीव गांधी यांच्या हत्येने केवळ भारतच नव्हे तर, संपूर्ण जग हादरून गेले. स्वतंत्र भारताचे असंख्य तरूण तेव्हा राजीव गांधी यांच्या नेतृत्वाने भाराऊन गेले होते. आत्मघातकी स्फोट करून राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येमागे लिबरेशन टायगर ऑफ तमिळ ईलचा (लिठ्ठे) हात होता असे मानले जाते.


बेअंत सिंह


पंजाबमधील दहशतवाद निपटून काढण्यात महत्त्वपूर्ण योगदान देण्यात बेँअंत सिंह यांचे मोठे योगदान राहिले आहे. ३१ ऑगस्ट १९९५ मध्ये बेअंत सिंह यांची हत्या झाली. पंजाब सचिवालयाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात बेअंत सिंह यांच्यासोबत 16 जणांचा मृत्यू झाला होता.


विद्याचरण शुक्ला


२५ मे १०१३मध्ये कॉंग्रेस पक्षाच्या एका रॅलीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात माजी मुख्यमंत्री विद्याचरण शुक्ल यांचा मृत्यू झाला. विद्याचरण यांच्या पोटात आणि चेहऱ्यावर गोळ्या लागल्या होत्या.