दयाशंकर मिश्र : उन्हाळ्याच्या काही बातम्या अधिक चर्चेत येत आहेत, देशाच्या वेगवेगळ्या भागातून, धक्कादायक बातम्या येत आहेत, यात अनेक परिवारांवर दु:खाचा डोंगर कोसळतो. आपण अनेक बातम्यांमध्ये पाहतो, कुटूंबातील एकुलता एक मुलगा नदीत बुडून गेला. तर काही बातम्यांमध्ये मुलांना नदीत पोहण्यास मनाई केली, तरी मुलं पोहायला जातात, आणि बुडतात. काही दिवसांआधी मी मनालीत होतो. कुल्लूहून मनालीला जाताना, रस्त्यात नदीपात्रात एक रेस्टॉरंट होतं, त्यावर नजर पडली. नदीपात्र आणि किनारा यात मधोमध असलेलं हे हॉटेल असं होतं की, याकडे लक्ष जाणार नाही, असं शक्यच नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे पाहून तिथे जाणारे सर्व प्रवासी थांबत होते. रेस्टॉरंटचे २ कर्मचारी सतत तेथे बाहेर उभे असायचे, ते प्रत्येक प्रवाशाला सूचना देत होते, की येथे नदी आहे, येथे उतरू नका. येथे जास्त धोका आहे. नदीपात्र खोल आहे, आणि पाण्याचा प्रवाह कधीही वाढू शकतो. प्रशासनाने देखील मोठमोठे बोर्ड तेथे लावलेले होते, 'धोकादायक झोन'साठी.


तेथे प्रत्येक ऋतूत कुणाचा तरी जीव जात होता. यानंतरही सेल्फी समाज कुठे ऐकत नसतो. मी दुसऱ्यांना हे सांगताना हे सुद्धा सांगू इच्छीतो की, आमच्या बरोबर असलेल्या ग्रुपमधील लोकांनीही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं, घाबरले नाहीत. नदीचा प्रवाहाच्या आकर्षणात तेथे जाऊन पोहोचले, घाबरून काहीच होत नाही, येथे तर आम्ही 'तुफानी' करायला आलो आहोत, 'डर के आगे जीत है' या सारखी फिलिंग आणि त्यासोबत वातावरणाचा ते आनंद घेत होते.


दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा मनालीत, त्या ठिकाणी गेलो, तेव्हा आमचे यजमान सांगत होते, की कसं यापासून थोड्याशा दूर अंतरावर, काही वर्षाआधी त्यांच्या येथे थांबलेल्या एका प्रवाशाचा भाऊ वाहून गेला. तो आतापर्यंत सापडलेला नाही. यानंतर आमच्या ग्रुपचे सदस्य लगेच म्हणायला लागले, अरे असं कसं झालं, लोक वेडे होतात, नदी आणि डोंगर पाहून. मला तेव्हा वाटलं दुसऱ्याची घटना ऐकल्यानंतर आपला मेंदू कसा लगेच बाजू बदलत जातो.


आम्ही असं करताना विसरून जातो, की जीवनात अनेक क्षण येतात, संधी येतात, पण मृत्यूसोबत ती बाब लागू होत नाही. अशा स्थितीत आपण निसर्गाची नियमांशी खेळू लागतो. तरूण असणे म्हणजे याचा अर्थ नियम तोडणे असा नाही. जर तुम्ही या सामान्य नियमांना नाही मानत, ज्याशी जीवनाची गाठ बांधली आहे, तर याची किंमत निसर्ग त्या आनंदापेक्षा कितीतरी जास्त पटीने वसूल करतो, जे काही क्षणात तुम्ही शोधत असतात.


हे फक्त डोंगर किंवा नदीबाबत लागू पडत नाही. प्रत्येक जागी जेथे तुम्ही आनंद शोधण्याच्या नादात लागले आहात. तेथे जर तुम्ही सामान्य नियमांचं पालन केलं, तर जीवनात अशा घटना घडणार नाहीत. या घटनेचं दु:ख आपल्यालाच नाही,  तर आपल्या संपूर्ण परिवाराला आयुष्यभर असतं. रस्त्यावर होणाऱ्या अनेक घटना या एक मिनिटाच्या उताविळपणामुळेच होतात. ज्या प्रवासातील अनेक लोक दोन मिनिटाच्या 'तुफानी' आनंदाच्या नावावर दुर्लक्ष करतात. आपल्यावर विश्वास होण्याचा अर्थ हा नाही की आपण नेहमी स्वत:ला जोखिममध्ये टाकावं. यात असं काही प्राप्त होत नाही. उलट या जोखिममध्ये जीवनात 'तुफान' येण्याची शक्यताच अधिक वाढत जाते.


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)


(https://twitter.com/dayashankarmi)


(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)