दयाशंकर मिश्र : आपल्या आजूबाजूला एवढा गोंगाट होत चालली आहे की, आपले दिवसेंदिवस ऐकण्याची क्षमता कमी होत चालली आहे. यात २ प्रकार आहेत, पहिला, यात एवढा गोंगाट आहे की, आपण ऐकण्यासाठी सक्षम नाहीत. दुसरा प्रकार, आपल्याला समोरच्या व्यक्तीला नीट ऐकूनच घ्यायचं नाहीय. आपल्याला फक्त दुसऱ्याला ऐकवायचं आहे. दुसऱ्यासाठी मन, हृदयात जागा संपत जाते, कमी होत जाते, यासारखी धोकायदायक गोष्ट दुसरी नाही. हे जाणीवेच्या विरोधात आहे, मानवतेच्या सिद्धांताला नाकारण्यासारखं हे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिअर जिंदगीच्या मागच्या लेखात, आपण घरातील चारभिंतीच्या आतील नात्यातील संवादावर लिहिलं. परस्परांविषयीचं प्रेम, संवादाच्या आधारावर हे लिहिण्यात आलं होतं, या लेखांना प्रेरणादायक प्रतिक्रिया मिळाल्या.


जयपूरच्या जुही वर्माला सर्वात जास्त दहा हाय दहाच्या खोलीतील २ लोकांच्या नात्याची गोष्ट आवडली. जुही लिहितात, दहा बाय वीसच्या खोलीत राहणारे, एकमेकांचा सन्मान करण्याच्या जागी, एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नानत जीवन नरकातल्या यातनांसारखं बनवून घेतात. जो जसा आहे, त्याला तसंच स्वीकारण्याची सवय, लाखो लोकांचं जीवन शांती आणि सुखमय होऊ शकतं. पण तुमचं पालनपोषण, स्त्री-पुरूषांमधील संवाद, संबंध याविषयीची शाळा एवढी कठीण झाली आहे की, एकमेकांना समजावणं कठीण होत चाललं आहे. जेव्हा सोबत राहणार एकमेकांना समजवू शकत नाहीत, तर घराबाहेरील लोकांनी, मित्रांनी हे समजावणं शक्यच नाही.


राँचीहून दुष्यत शॉ लिहितात, डिअर जिंदगी, आमचा अबोला संपवण्याच्या दिशेने सुरूवात आहे, आम्ही ज्या वेगाने मनाची नदीवर बांध बांधत आहोत, कारण मनातील दुष्काळ एवढा वाढला आहे की, सर्वात जास्त किंमत आपल्यालाच चुकवावी लागत आहे.


जर आपण लक्षात घेतलं तर ताण-तणाव आपल्या आत्मापर्यंत कुठून आणि कसा पोहोचत आहे. तणाव आणि नैराश्य आपल्यासमोरच आपल्या समजुतदारपणाला बाजूला सारत, 'मन' पार करत आत्मापर्यंत पोहोचत आहे.


नात्यात अडचणी यायला सुरूवातच तेथून होते. ज्या वेळेस आपण ऐकमेकांना ऐकणं बंद करतो, मनाच्या नदीत स्नेहाचं दुष्काळ सुरू झाला. पती-पत्नीच्या संसाराचा काडीमोड झाला, तर त्याची पडताळणी करा, तेव्हा तुम्हाला हे सहज लक्षात येईल. आपण संबंधांचा आधार असाच ठेवतो की, त्यात असहमतीसाठी काही जागाच ठेवत नाहीत.


आपण वाढलोच असे आहोत की, सहमतीच्या भावनेने सुरूवात करतो, यात दुसऱ्याच्या भावना आणि असहमताला जागाच ठेवली जात नाही.


कदाचित, आपण आपल्या बालपणापासून काही शिकू शकलो असतो, आश्चर्य़ाची गोष्ट ही आहे की, लहानपणाच्या सर्व गोष्टी आपण मोठे झालो की विसरून जातो. बालपणी आपण किती प्रेमात एकमेकांना, भावनिकपणे, संवेदनशीलपणे ऐकमेकांना ऐकतो. खरंतर एकमेकांना स्पेस देतो. ही किती सहज, सरळ गोष्ट आहे. पण बालपण गेल्यानंतर आपण घरातच हे सर्व विसरून, जीवनाच्या मैदानात उतरतो. एक दुसऱ्यासाठी दरवाजे बंद करताना, आपण हे विसरून जातो की, एकेदिवशी आपण देखील पाऊस, ऊन आणि वादळात कुणाच्या तरी दारावर उभे असू.


जीवन काही वेगळं नाही, भूतकाळाचा बूमरँग आहे, यासाठी वर्तमानाला वळण द्या, ज्यामुळे भुतकाळ प्रकाशित राहिल.


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)