डिअर जिंदगी : मुलीला मुलासारखं म्हणणं, तिचा अपमान आहे
तुलनेला `नाही` म्हणा, असे शब्द, असे वाक्य टाळा. जे विचारांपेक्षा, मनोविकाराचं रूप घेतात. कुणाचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी, दुसऱ्याच्या प्राधान्याचा विचार करून, त्या प्रभावाखाली विचार करणे, हे बंद गल्लीसारखंच आहे.
दयाशंकर मिश्र : जर एका शब्दात म्हणायचं झालं की, जीवनात सर्वात जास्त त्रासदायक वाटणारी गोष्ट कोणती आहे, तर उत्तर एकदम स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर...तुलना. या शब्दाने जेवढं आमचं नुकसान केलं आहे, तेवढं कुणीच केलेलं नाही. पुढे जाऊन मानवतेला, यापेक्षा अधिक त्रास कोणत्या गोष्टीपासून होत नसेल. तुलनेशिवाय जीवन किती सुखी आहे. कारण आपली संपूर्ण चेतना ही तुलनेशी बांधली गेली आहे.
सुखी तोच आहे, जो स्वत: स्थिर आहे, संयमी आहे. स्वत:ला मर्यादीत करणे असंच आहे. जसं आपण सांगतो की मी सरळ मार्गी आहे. पण खरंतर आपल्या आजूबाजूला लाखों लोकांमध्ये एखादाच सरळ माणूस असतो. ज्याने जीवनाला आणि स्वत:ला एक केलं आहे, तोच सरळ असू शकतो.
आता विचार करा, आपल्या नेहमी बोलण्यात येणाऱ्या वाक्यांवर, जे आपण पुन्हा पुन्हा बोलतो. असं एखादंच वाक्य असेल, जे आपल्या ध्यानात अजून आलेलं नाही, सर्वात मजेदार गोष्ट आहे की, याचा वापर सर्वच करतात, ज्यांच्या घरी मुलगा-मुलगी आहेत ते, आणि ज्यांच्या घरी मुलगी आहे, ते देखील.
तुम्हाला नेहमी असं ऐकण्यात येईल की, आमची मुलगी मुलाची बरोबरी करते. मुलापेक्षाही अव्वल आहे. मुली आज मुलांपेक्षा कमी नाहीत, मागे नाहीत. आपले शब्द फक्त शब्द नसतात. त्याच्या पुढे त्या आपल्या भावना असतात. आपण जो विचार करतो, त्याचाच तो आरसा, प्रतिमा ते शब्द असतात.
आपण काय विचार करतो, काय निर्णय घेतो, याची झलक आपल्या शब्दांपेक्षा चांगली आणि कुठेच मिळत नाही. तर हे जगजाहीर आहे, की आपले शब्द सांगतात की, आपले शब्द मुलांचं कौतुक करतात. आपल्या डोक्यात सर्वात आधी हे आहे की, मुलंच अव्वल, गरजेचे आणि अनिवार्य आहेत. यासाठी की ते नेहमी अग्रस्थानी आहेत. मात्र भारतात, विशेषत: उत्तर भारतात, आपण मुलींना समान पातळीवर पाहण्यात फार मागे आहोत.
आपले रोजच्या बोलण्यात येणारे शब्द, मुलांच्याही बोलण्याच्या रोजच्या संवादात येतात, त्यांना देखील याची सवय होते. पण हेच शब्द, पुढे जाऊन मुलांचं मानसशास्त्र ठरवण्यात निर्णायक आहेत. मुलांना लहानपणापासून नीट न घडवल्याने, आता आपल्या आजूबाजूला मुलगा आणि मुलगी यांच्यातील समानतेवरचं संकट उभं राहतंय.
आपण असे अनेक परिवार पाहिले असतील, जेथे मोठी बहिण आपल्या भावाला दादा म्हणून बोलवते, कारण तिच्या आधी, तिच्या आईने देखील हेच केलं होतं. आणि ही देखील शक्यता आहे की, त्यांच्या पित्याने देखील, लहान असला तरी हे दादा म्हणवून घेण्याचं 'सुख' घेतलं असावं.
पहिल्या नजरेत ही बाब जरा विचित्र वाटू शकते, पण थोडा थांबून विचार करा, हे शक्य आहे, ही बाब शरीराच्या आतपर्यंत जाऊ शकते. आम्ही आपले शब्द, भाषा, विचार यांच्याशिवाय, फक्त रोबोट बनून राहिलो आहोत.
यासाठी, जीवनाविषयी एक दृष्टीकोन ठेवा. जे होतंय, जसं होतंय, त्याचा भाग बनून, आपण माणूस बनून, मुलभूत नियमांचं उल्लंघन करत आहोत. आपण आपल्या आसपास काय हस्तक्षेप करत आहोत, हा एक सामान्य प्रश्न आहे, जो आपण स्वत:लाच केला पाहिजे.
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत) (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)