दयाशंकर मिश्र : डिअर जिंदगीच्या वाचकांचे ईमेल, मेसेज येत आहेत, यात जीवनाविषयी पाहण्याच्या दृष्टीकोनात आत्मविश्वास कमी होत चालल्याचं दिसून येत आहे. अडचणीत लढण्याचं कसब. कोणत्याही परिस्थितीत स्वत:बद्दल असलेला आत्मविश्वास. संकटाच्या चक्रव्यूव्हमध्ये जीवनाचा दोर घट्ट पकडून ठेवणे. जयपूरहून सजग वाचक, खासगी कंपनीत मॅनेजर पदावर असलेले सुदेश चतुर्वेदी लिहितात, भूतकाळातील आठवणींपासून पिच्छा सोडवणे सोपं नाहीय. सुदेश ३० वर्षापासून लिहितात, बालपण आईवडीलांच्या भांडणात गेलं. सतत हिंसा, तणाव आणि भीतीचा सामना करावा लागला. जेव्हा आता जीवन खूप काही माझ्यानुसार सुरू आहे. तेव्हा देखील भूतकाळापासून मुक्ती मिळत नाहीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूतकाळातील आठवणी सतत आपल्या मनाला गुंतवून ठेवतात. ही अडचण जीवनाला प्रेम, आत्मियता, स्नेहापासून दुसऱ्या गल्लीत घेऊन जाण्याचं काम करते.


सुदेश भूतकाळाच्या अडचणींपासून बाहेर येत निघू शकत नाहीय. यातून बाहेर येणं कठीण नसलं, तरी सोपं देखील नाहीय. जीवन खरं पाहिलं तर स्वेटरसारखं विनलं जातं. बालपणात आपण सर्वांनी घरी स्वेटर विणलं जाताना पाहिलं असेल. तेथे एक धागा जरी चुकीचा विणला गेला, तरी अनेक वेळा असं होतं होतं की, स्वेटर विनण्याचं काम आई, काकी, किंवा ताईला पुन्हा नव्याने करावं लागत होतं.


ही भूतकाळाला समजून घेण्याची एक बाजू झाली. दुसरी बाजू विणकरांची, त्यांची काम करण्याची पद्धत. किती सफाईदारपणे ते एक टोक संपलं की दुसऱ्या कामाला सुरूवात करतात. जर कुठे गाठ बांधयाची असेल, तरी ती बाहेर दिसत नाही, किंवा जाणवत नाही. पण आपल्या नात्याची गाठ लावण्याची वेळ आली तर, एखादी तोडून दुसरा धागा विणण्याची वेळ आली तर, आपण बेचैन होतो. नवीन सुरूवात सोपी तर नाही, पण कठीण जरूर आहे.


प्रसिद्ध गिर्यारोहक अरूणिमा सिन्हा यांची कहाणी तुम्ही कदाचित ऐकली असेल. जर ऐकली नसेल तर आज ऐका. अरूणिमा यांच्यासोबत  अशी घटना घडली, ज्यामुळे त्यांच्या जीवनाचा बेरंग होण्याची वेळ आली, पण त्यांनी आपला आत्मविश्वास सोडला नाही. अरूणिमा यांच्यासमोर अडचणींचा पराभव होत गेला. रेल्वे प्रवास करत असताना ११ एप्रिल २०११ रोजी तिचं सामान हिसकावण्याचा गुंड़ांनी प्रयत्न केला, पण त्यांना विरोध केल्यामुळे तिला त्यांनी रेल्वेतून खाली फेकून दिलं. उत्तर प्रदेशातील बरेलीजवळ ही घटना घडली.


अरूणिमाचं जीवन एका प्रकारे पटरीवरून खाली उतरलं, अरूणिमा यांचा एक पाय कापला गेला होता. तिचा पाय तिच्या डोळ्यासमोर उंदीर कुरतडत होते. अरूणिमा यांना प्रचंड वेदना होत होत्या. पण मेंदू अरूणिमा यांच्यासोबत होता. मन म्हणत होतं, अरूणिमा तुला लढायचंय. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधून ४ महिन्यानंतर ती घरी गेली, ती बछेंद्री पाल यांना भेटली. इलाज केल्यानंतर तिने ठरवलं होतं की, जीवनाला एक ओझं म्हणून जगायचं नाहीय. तर कठीण पर्वतासारखं पार करत जायचंय. अरूणिमाचा एक पाय कृत्रिम (प्रोस्‍थेटिक) आहे, दुसऱ्या पायात रॉड लावलेला आहे.


कहाणी थोडी मोठी होती. तुम्ही इंटरनेटवर कधीही सहज वाचू शकता. थोडक्यात एवढंच सांगतो, आज अरुणिमा अटार्कटिकाच्या १६ हजार फूट उंचीचं माऊंट विन्सर सर करणारी पहिली दिव्यांग गिर्यारोहक आहे. अडचणींसाठी त्यांच्याकडे एकच उत्तर आहे, लढायचं, हरायचं नाही. जीवनाच्या या सुत्रामुळे ती सर्व मानसिक आणि शारीरीक अडचणींसोबत लढू शकते.


मी भूतकाळातील आणि वर्तमानातील लहान लहान गोष्टींसोबत लढणाऱ्यांच्या बाबतीत हेच सांगतो. आपण आव्हानांना थांबवू शकत नाहीत. आव्हानं तर येतंच राहतील. आपण केवळ फक्त त्यांच्याशी लढू शकतो. जगभरातील सर्व धर्म आणि त्यांचे उपदेश यांचा एकच अर्थ आहे, प्रत्येक अडचणींचा सामना करा. काहीही झालं तरी जीवन जगणं सो़डू नका. दुसऱ्यांचं जीवन जेवढं सोपं करता येईल करा. कारण आपलं जीवन सोपं बनवण्याचा हा सर्वात मोठा साधा सोपा मार्ग आहे.


जीवन काही साचलेलं तळं नाही, जे आपल्या नियंत्रणात असेल, जीवन एक वाहती नदी आहे, वाहत असतं सतत. यात नदी वाहती ठेवण्यासाठी जेवढा हिस्सा ढगांचा आहे. तेवढंच त्या पाण्याला अडवणाऱ्या लहान लहान बंधाऱ्यांचा देखील. नदी तरी देखील ते ओलांडून रस्ता काढत असते. तिचं काम थांबणं नाहीय. चालत जाणे आहे, जोपर्यंत समुद्र नदीला मिळत नाही. प्रत्येक मुक्कामानंतर नवीन प्रवास. हेच नदीचं जीवन आहे.


ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com


पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)