दयाशंकर मिश्र : आत्महत्या. भारतापासून अमेरिकेपर्यंत हे संकट वादळासारखं वेगाने, सुंदर मानवी जीवनावर घोंगावत आहे. एक वेळ अशी होती की, देशात आत्महत्या असे लोक करत होते, ज्यांच्याजवळ पैसे नव्हते. आर्थिक चणचणीमुळे त्यांना आत्महत्या करावी लागत होती. ज्यांना यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. अशा आर्थिक संकटामुळे आत्महत्या करण्यात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पण मागील पाच वर्षात जगभरात जेवढ्या वेगाने तंत्रज्ञान, गॅझेट्स आणि बोलण्याची सुविधा वाढली आहे. तेवढ्याच वेगाने जीवनाकडे पाहण्याचं गांभीर्य कमी होत चाललं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील ही गंभीर बाब शोधण्यासाठी जरा अमेरिकेकडे जावं लागेल. कारण आपला समाज आपल्याचं समाजाकडे जरा जास्तच अपेक्षा ठेवून आहे. याला हावरटपणाही म्हणता येईल. न्यूयॉर्क टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, 'अमेरिकेत २०१६ मध्ये १० वर्षापेक्षा कमी वयाच्या ४५ हजार नागरिकांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यात वेगाने वाढ होत आहे. १९९९ च्या तुलनेत या आकड्यांमध्ये २४ टक्के वाढ झाली आहे. जगातील सर्वात संपन्न समाज, आतून मानसिक आजाराने पोखरला गेल्याचे हे संकेत आहेत'.


भारत देखील या धोकादायक जगात वेगाने ओढला जात आहे. काय कारण आहे की,  या समाजात 'गप्प'ची समृद्ध परंपरा राहिली आहे. संवाद, उत्सवची कोणतीही कमतरता नाही. समाधान हा एक गुण म्हणून येथे स्वीकारला गेला आहे. प्रत्येक वादाआधी कायद्याआधी समाज, मित्र, परिवार खासगी स्तरावर चर्चेसाठी तयार आहे. तरीही येथे असं कोणतं संकट वाढत चाललंय की, आपल्यातील चांगलं वाईट, सकस, संपन्न व्यक्ती फाशी, विष प्राशन, रेल्वे पट्टयांवर, छतांवरून, गॅलरीतून जीवन संपवायला निघाली आहे.


असं काय आहे, ज्यात मित्र, कुटूंब हे सर्व ओळखण्यात कमी पडतंय. मनाच्या आत असा कोणता रोग वाढायला लागला आहे. ज्यात आपल्याच अडचणी, आपल्याच लोकांना सांगण्यात कोणती लाज. आपण जीवनाच्या जागी मृत्यू का निवडतोय.


जर या समाजात तुम्ही एकटे नाहीत, तर तुमचं परिवार, शेजारी, समाजाशी सलोखा तुम्ही राखत आहात, तर जरा थांबा, सांभाळा स्वत:ला. परिवार, मित्र, शेजारी यांच्याशी आवश्यक गोष्टी जरूर बोला. एकमेकांशी बोला. प्लिज बोलणं महत्वाचं आहे.


आपण सर्वजण मिळून आत्महत्येच्या तीव्रतेला समाजातील काही कारणांवर बातचित करून कमी करू या. यानंतरच हे प्रमाण कमी करता येऊ शकतं...!


मित्रांची संख्या झिरो, मोबाईलमध्ये असा एक नंबर शोधणं मुश्किल, ज्याच्याशी बोलताना रेकॉर्ड होण्याची भीती नसेल. दु:ख, मनाची कालवा कालव सांगणे तर दूर, मनातील सुख वाटून घेणारंही कुणी नाही. मित्रांना कधी भेटणं नाही. परिवारातील संवाद कमी होणं धक्कादायक संकेत आहेत. जेव्हा आपण मनातलं सांगणं बंद करतो, तेव्हा मनाचा आजार आणखी वाढत जातो. 


तुमच्याकडून काहीही चूक झाली असेल, तरीही ती सुधारणे, हे अगदी शक्य आहे. कारण आलेली वेळ नेहमीच बदलत असते. वेळ अशी नदी आहे, की सर्व कचरा आपल्या पोटात घेते. म्हणून वेळेवर विश्वास ठेवा. लोक काय म्हणतील, यासारख्या गोष्टी अगदी निरर्थक आहेत. लोक नेहमी काही म्हणतील, म्हणून त्यांचा सामना करा. खोटी प्रतिष्ठा आणि सन्मानाच्या अंधकारातून बाहेर या. कारण या ठिकाणात जीवनाचा श्वास गुदमरतो.


जीवनात काही अडचणी कडक उन्हासारख्या असतात, त्या सहन करण्याची क्षमता असली पाहिजे, हरण्याची नाही. शिक्षण, संवाद आणि कला, साहित्याची कमतरता, आपल्याला कोरडं आणि कठोर बनवतेय. आपण दु:ख, त्रास आणि एकमेकांना सहन करण्याच्या क्षमतेतून बाहेर जात आहोत.


तणाव, दु:खी, अपराधाने भयभयीत झालेल्या मनावर दडपण आल्यानंतर आत्महत्या होतात. बाहेरून यशस्वी, सुखी दिसणारं शरीर, पण मनाच्या आत होणारी घालमेल, डिप्रेशन आणि एकटेपणा समजणे सहज शक्य नाही.


आत्महत्या केल्यानंतर मागे काही राहून जात नाही. पण सर्व अप्रिय, कडवट, न समजणारे प्रश्न जीवन भर आपल्याजवळच्यांना घाबरवून सोडतात. आत्महत्या हे त्यांच्यासाठी सर्वात मोठा अपराध आहे, ज्यांच्यावर तुमचं अधिक प्रेम आणि स्नेह असल्याचं तुम्ही म्हणत असतात.


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)