कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड : परगण्यातील पोलिस मुख्यालयात आपल्या खुर्चीवर उदास होत 'अश'ओक 'डो'अंगरे उदास बसला होता...! एरवी कृष्ण सरांप्रमाणेच मिशी पिळनाऱ्या 'अश'ओक चा हात काही केल्या मिशि पिळण्यासाठी जात नव्हता...! मन'ईश' कल'अन्याकर हे ही उदास मुद्रेने एक टक खिडकी च्या बाहेर पहात बसले होते...! नुकतेच हिंजवडी कडे कूच केलेल्या वि'वएक ला ही जेवणाचा घास गोड लागत नव्हता....! तिकडे चाकण प्रांतात ही उदासी पसरली होती...! सा'आगर, ' 'प्रे'अर्ना यांचं ही मन काही लागत नव्हते...! एकूणच पिंपरी चिंचवड परगण्यातील पोलिस मुख्यालयातील अनेक जीव उदास आणि कासावीस झाले होते..! त्याला कारण ही तसंच होते म्हणा...! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिस मुख्यालयाची सुत्र हातात घेतल्यानंतर अल्पावधीतच परगण्यातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले, आयर्न मॅन 'कृष्ण' सर यांना अचानक हा कारभार सोडत थेट मुंबई प्रांतात जावे लागले...! हा धक्का सहन तो कसा होणार...! 'कृष्ण' सरांच्या अनेक पराक्रमाला आपण साक्षीदार राहिलेलो...! पोलिस स्थानकाचे कामकाज कसे होते हे पाहण्यासाठी त्यांनी चक्क वेषांतर करत पोलिस स्थानकाना भेट दिली होती...! 


त्या वेळी आपली ओळख समोरच्याला कळणार नाही यासाठी त्यांनी कोण प्रयत्न केल्याचे आठवत 'प्रे'अर्ना यांना गलबलून आले...! तर दुसरीकडे मुख्यालयातील काही जण त्यांचा चाकण मधला पराक्रम आठवत होते...! पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या तीन गुंडांना ते डोंगराकडे पळत असताना 'कृष्ण' सरांनी एक झाड आपल्या बलदंड बाहूने कसे उचलले आणि गुरुत्वाकर्षण नियमाच्या विरोधात जात त्यांनी ते डोंगराच्या दिशेने भिरकावीत त्या तीन गुंडांना कसे पकडले हे आठवताना तर अनेकजण हमसून हमसून रडत होते...! 


काहींना महिन्याभरपूर्वीच झालेला किस्सा आठवून कंठ दाटून येत होता..! एका  किरकोळ गुंडाला पकडण्यासाठी ही त्यांनी केलेलं वेशांतर आणि शिताफीने त्यांनी पकडलेला तो गुंड हा सारा प्रसंग अनेकांच्या खास करून हरईश 'म'आने च्या डोळ्यांपुढन जाताना त्यांचा हुंदका बाहेर पडला...! 


आता केलेल्या पराक्रमाची माहिती देत पत्रकार संवाद करण्यासाठी मुख्यालयात कसं जायला मिळणार, आता आपला पराक्रम सांगायला नवीन प्रमुख तयार होईल का या विचारात परगण्यातील स्थानक प्रमुख डोळे मिटून विचार करत बसले होते...! अगदी गाडी चोरांना पकडले तर मुख्यालयात पत्रकार संवाद व्हायचा आता तो होईल का ही चिंता अनेकांना सतावू लागली...! 


'कृष्ण' यांच्या कौतुकाचे रखानेच्या रखाने भरण्याची सवय लागलेल्या काही बोरूबहद्दरानाही चांगलीच चिंता वाटू लागली..! 


या सगळ्या चिंतानी पोलिस मुख्यालयातील स्थानकातील अनेकजण व्यतिथ झाले असताना 'कृष्ण' सरांच्या जागी 'अंकुश' यांनी पोलिस मुख्यालयातील सूत्र हातात घेतली ही...! तिकडे परगण्यातील जनता या बदलाने काही विशेष दुखावली नाही की सुखावली नाही..! 


आता शहरातील गुन्हेगारीवर 'अंकुश' बसणार का या चिंतेत ती होती...! तिकडे परगण्यातील हिंजवडी प्रांतांची वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असलेला 'वि'ठठ ल मात्र काहीसा सुखावला..! तर मुख्यालयात डोळे मिटून बसलेल्या 'अ'शओक ने या 'अंकुश' रुपी विठ्ठलाचे बडवे होता येईल का विचार सुरू केला आणि त्याचा चेहरा कमालीचा आनंदीत झाला असताना।परगण्यातील जनता आज काही होणार नाही ना या विचाराने निद्रिस्त झाली आणि मुख्यालयातील प्रसिद्धी नात्याचा एक अंक पूर्ण झाला...!


( पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त बदलीवर आधारित थोडासा काल्पनिक लेखन प्रपंच...!)