पोपट पिटेकर, मुंबई : शेतकरी शेती करुन कोणत्याही पिकांपासून जास्तीत जास्त काही वर्षापर्यंत पैसे कमवू शकतो. परंतू तुम्हाला जर अनेक वर्षांपर्यंत पैसे कमवायचं असेल तर नक्कीच सुपारीचे झाड लावून वर्षांनुवर्षे तुम्ही पैसे कमवू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपारी उत्पादनात भारत हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील जवळपास 50 टक्के सुपारीचं उत्पादन हे भारतात होते. सुपारीचा वापर फराळ, गुटखा मसाला मध्ये देखील केला जातो. भारतीय घरांमध्ये धार्मिक विधी दरम्यान सुद्धा सुपारीचा वापर दिसून येतो. 


सुपारीत अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतात. मागणी जास्त असल्याने आणि त्याच्या गुणधर्मामुळे सुपारी बाजारात चांगल्या दरात विकली जाते. विशेष म्हणजे सुपारीची झाडे नारळासारखी 45 ते 55 फूट उंच असतात. सुपारीच्या झाडांपासून 6 ते 7 वर्षात फळ देण्यास सुरुवात होते. तुम्ही एकदा लागवड केल्यानंतर तब्बल 70 वर्षापर्यंत सतत नफा मिळवू शकता. 


लागवड कुठे करावी?


सुपारीची लागवड कोणत्याही जमिनीत किंवा मातीत तुम्ही करु शकता. परंतू चिकणमाती असेल तर त्याच्या लागवडीसाठी सर्वात उत्तम. सुपारीचे झाडं हे नारळासारखे 45 ते 55 फूट उंच असतात. झाडांपासून तुम्हाला फळ देण्यास 6 ते 7 वर्षात सुरुवात होते. 


लागवड कशी करावी?


सुपारीच्या रोपांची लागवड बियाण्यापासून म्हणजे रोपवाटिका तंत्राद्वारे केली जाते. बियाणापासून रोपे तयार केल्यानंतर ते शेतात प्रत्यारोप केलं जाते. रोपे लावल्यानंतर तेथे ड्रेनेज सिस्टम असणे आवश्यक आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी शेतात छोटे नालेही तुम्ही करु शकता. रोपे लावण्यासाठी पावसाळ्यात म्हणजे जुलैमध्ये त्यांची रोपे लावणं सर्वात चांगला काळ आहे. झाडासाठी तुम्ही शेणखत आणि कंपोस्ट खत वापरु शकता. 


किती कमवू शकता?


सुपारीच्या झाडांपासून 5 ते 7 वर्षांपर्यंत उत्पन्न द्याला सुरुवात होते. तुम्ही तीन-चतुर्थांश पिकल्यावरच त्यांची फळे काढावी. सुपारी काढल्यानंतर बाजारात त्यांची चांगल्या किमतीला विक्री होते. त्याची किंमत सुमारे 360 ते 550 रुपये प्रति किलो मिळू शकते. याप्रमाणे एका एकरात सुपारीची लागवड केल्यास तुम्ही चांगला नफा कमवू शकता. तुम्ही जर चांगल्या प्रकारे लागवड केली, तर शेतातील झाडांच्या संख्येनुसार हा नफा लाखांपासून कोटींपर्यंत सहज पोहचू शकतो.