दयाशंकर मिश्र : सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!. दिव्यांच्या झगमगाटात आपण या दिव्यांना उजळवलं तर, उदासपणा, डिप्रेशन आणि निराशा नेहमीसाठी दूर होईल. जीवनात आशेचा दीप आपल्याला नेहमीच तेवत ठेवता येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीवन योग्य रस्ता निवडत असतं, फक्त वादळातही नाविकासारखी तुमची वाट सोडू नका.
वेळ कशीही असो, तुम्ही सर्वात महत्वाचे आहात, तर आकाशात तारे आणि समुद्रात मोती आहेत.
कमीत कमी मित्र असावेत, ज्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता यावं, ज्यांच्या समोर सर्व मन उघडून सांगता यावं.
आदरणीय व्यक्ती आपल्या सोबत राहण्यासाठी आहेत, अनाथालयात नाही, त्यांचा आदर करा, मुलांना प्रेम द्या.
मनातला अंधार, दुसऱ्यांसाठी मनात असलेला मळ, अप्रिय आठवणी, प्रत्येक कोपऱ्यात प्रेमाचा उजेड पसरू दे.


आणखी वाचा  डिअर जिंदगी : 'वस्तूं'च्या जागी निवडा अनुभव...


सर्वात महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो... मुलं तुमची आहेत, तुमच्यासाठी नाहीत, त्यांचा जन्म तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाहीय. तर त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झाला आहे. कुणाच्या स्वप्नात अडथळा होवू नका. ती मुलं तुमची जरी नसली तरी, अडथळा कुणालाच मान्य नसतो.


यासाठी, प्रेम करा. मुलांना ताज्या हवेत बागळू द्या. मोठ्यांना आदराचं स्थान आणि मानसन्मान द्या. 


आणखी वाचा डिअर जिंदगी : आपल्या जीवनातील दुसऱ्याचा 'वाटा'


ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com


पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)