दयाशंकर मिश्र : महाराष्ट्रातील नागपूरहून 'डिअर जिंदगी'ला एक ई-मेल आला आहे. तणावाचा सामना त्यांनी कसा केला, याचा खूप चांगला अनुभव त्यांनी यात सांगितला आहे. हा अनुभव अनुज दुबे यांनी लिहीला आहे, त्यांचे वडील गावात राहतात. अनुज हे नागपुरमध्ये मुलगा आणि पत्नीसह राहतात. एका खासगी कंपनीसाठी ते काम करतात, त्यांचं काम लवकर न संपणारं होतं. यामुळेच अनुज यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची पत्नी तशी नाराज राहत होती. अनुज यांचं वय ४० च्या जवळपास, तर मुलगा १० वर्षांचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर अनेक दिवसांनी अनुजचे वडील काही दिवसांसाठी गावाहून नागपुरला राहायला आले. पण अनुज यांच्या वडिलांना अनुज संपूर्ण वेळ ऑफिसच्या कामात अडकलेला दिसत होता, ते त्यांना खटकत होतं. नातवाने देखील हीच तक्रार केली. यानंतर मुलाशी म्हणजेच अनुजशी बोलून त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न तसा अयशस्वीच ठरला, कारण मुलाला त्यांच्याशी बोलायला वेळंच नव्हता. अनुज आपल्या कामात एवढा व्यस्त होता की, यात तो वडिलांसाठी कार, ड्रायव्हर, तिकीट यांची देखील व्यवस्था करू शकला नाही.


अनुजचे वडील त्यांच्याजवळ एक चिठ्ठी लिहून सोडून गेले, चिठ्ठीत जे लिहीलंय, ते वाचनीय आहे... त्यातील काही प्रमुख मुद्दे खाली देत आहे.


तू म्हणतो, माझ्या जवळ वेळ नाहीय. पण आधीपेक्षा माझ्याकडे वेळ अधिक आहे, माझ्याविषयी विचार कर, मला रेल्वे तिकीटासाठी लांबच लांब रांगेत उभं राहावं लागत होतं. बँकेत पैसा जमा करण्यासाठी, काढण्यासाठी गर्दीचा सामना करावा लागत होता. कुठे येण्या-जाण्यासाठी अनेक दिवस लागत होते. माझी नोकरी देखील तुझ्या नोकरीच्या तुलनेत कमी पगाराची होती. पण मी कधी एवढा चिंतेत, आजारी, नोकरीत अडकलेला नव्हतो.


तू मुलांना गोष्टी नाही ऐकवत, प्रत्येक गोष्टीसाठी तू त्यांना गूगल सर्च करायला सांगतो. तो तुझ्यापेक्षा टीव्हीचा मुलगा जास्त झाला आहे. त्याला कुठे फिरायला नाही घेऊन जात. जेव्हा कुठे घेऊन जातो, तर मॉलच्या नीरस जगात सोडून येतो. कारण तुला शॉपिंग करता यावी. तू त्याच्यासाठी खूप काही करतो, पण त्याच्यासोबत राहून नाही.


तू मुलासोबत आनंदाचे क्षण नाही घालवत. तो नातेवाईक, आपल्या चुलत-भावा बहिणीपासून दूर होत चालला आहे. तू केवळ त्यांना शाळेच्या दुनियेत बुडवून ठेवलं आहे. तुझ्याजवळ माझ्यापेक्षाही जास्त सुविधा असतानाही, त्याचा दृष्टीकोन रूक्ष होत चालला आहे. 


मी कधीतरी तुला परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी केल्याचं सांगितलं असेल, तरी देखील तुझ्याकडे आज एक चांगली नोकरी आहे. सुरक्षा आहे पैसा आहे. पण त्यानंतर जेवढं स्वातंत्र्य, मोकळीक तुला दिली, तेवढी देखील तू तुझ्या मुलाला देऊ शकलेला नाहीस, कोणत्या भ्रमात आहेस. आपल्या मुलांवर प्रेम कर, त्याचा श्वास तुझ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबला जाणार नाही ते पाहा.


माझा मुलगा म्हणून मी तुझ्यावर आणि माझ्या नातवावर जीव टाकतो. यावरून मला वाटतं की, तू माझ्या वाटेचं प्रेम तू त्यालाही दे. त्याला टीव्ही, रोबोट आणि शाळेच्या भरवशावर ठेवून तसाच बनवू शकत नाही, जसा तू विचार करतो.


तुला जास्त काही करण्याची गरज नाही. बस स्वत:ला असं बनवं की, तुझ्या आपल्यांनाच तुझी स्वप्न अडथळे वाटायला नकोत. जेथे काही निवडण्याची वेळ आली तर, प्रेम, स्नेह आणि सोबत निवड. एक दिवस असा देखील येईल, की तू तुझ्या मुलाजवळून हेच मागशील, जो आज तुझ्याकडून मागतोय. कधी असं होऊ नये की, त्याचं उत्तर तुला रूक्ष, स्नेह आणि प्रेम नसलेलं वाटू नये.


तुझा बाबा


ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com


पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)