जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : यूट्यूबवरची व्हिडीओ चोरी अजिबात शक्य नाही. जर तुम्ही चांगलं यूट्यूब चॅनेल सुरू करण्याच्या विचारात असाल, आणि यूट्यूबमधून पैसे कमावण्याच्या विचारात असाल, आणि दुसऱ्याचा व्हिडीओ डाऊनलोड करून, व्हॉटसअॅप किंवा फेसबुकवरचा दुसऱ्याचा व्हिडीओ तुम्हाला वापरायचा असेल, तर तो विचार मनातून काढून टाका.


कॉपी राईट व्हिडीओ-म्युझिकलाही लागू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण तुम्ही असा व्हिडीओ डाऊनलोड केला आणि यूट्यूबवर तुमच्या अकाऊंटने अपलोड केला, तर तुम्हाला त्याच वेळी खाली मेसेज दिसेल की हा व्हिडीओ दुसऱ्याचा आहे, तो तुम्ही काढून टाका. हे फक्त व्हिडीओ नाही, तर म्युझिकच्या बाबतीतही लागू आहे.


चोरी कधी ना कधी पकडलीच जाणार


तुम्ही ग्राफिक्स करून दुसऱ्याचा व्हिडीओ वापरला तरी ते यूट्यूबच्या बदलत्या तंत्रज्ञानाने कधी ना कधी समोर येणारंच आहे. आणि एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्याचे व्हिडीओ वापरले तर तुमचं चॅनेल बॅड रेकॉर्डमध्ये जातं, म्हणजे जाहिरातीचे पैसे मिळतील हे विसरूनच जा.


3 पेक्षा जास्त कॉपीराईट झाले तर संपलं


दुसरी महत्वाची बाब म्हणजे जर तुमच्यावर एकूण 3 पेक्षा जास्त कॉपीराईट झाले आणि त्याचं समाधानकारक उत्तर दिलेल्या वेळेत आलं नाही. तर तुमचं चॅनेल तुम्हालाही दिसेनासं होईल. तुमचे यापूर्वी अपलोड केलेले व्हिडीओ यूट्यूबवर दिसणारच नाहीत.


यूट्यूबकडून काही कॉपीराईट फ्री म्युझिक ट्रॅक


म्हणून तुम्ही या गोष्टीवर भर द्या की, तुमचे व्हिडीओ हे तुम्हीच शूट केलेले असतील, चोरीचे नसतील, किंवा सोशल मीडियावरून उचलेगिरी केलेले नसतील, तुम्हाला म्यूझिकची गरज पडत असेल, तर यूट्यूबकडून काही कॉपीराईट फ्री म्युझिक ट्रॅक पुरवले जातात, ते यूट्यबवरच मिळतात, ते आपण पुढच्या लेखात पाहू या.