सामना सुरू असताना मैदानात उतरलं एअर अॅम्ब्युलन्स, पाहा व्हिडीओ
सामना सुरू होताच मैदानात उतरली एअर अॅम्ब्युलन्स, नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ
लंडन: आतापर्यंत मैदानात चाहते, कुत्रा किंवा कोंबडा आल्याने मॅच थांबल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र सामना सुरू असताना चक्क मैदानात एअर अॅम्ब्युलन्स उतरल्याची घटना समोर आली आहे. मैदानात हेलिकॉप्टर उतरल्याने क्रिकेटपटूनी मैदाना सोडल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सामना सुरू असताना पहिल्याच ओवर दरम्यान हा प्रकार घडला.
क्रिकेटच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरल्याने सर्वजण नेमका काय प्रकार आहे हे पाहात राहिले. मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट चॅम्पियनशिप सामने सुरू होते. याच दरम्यान ब्रिस्टल मैदानावर मंगळवारी एक सामना झाला. ग्लूस्टरशायर विरुद्ध डरहम सामना सुरू होता.
सामना सुरू असताना हेलिकॉप्टर मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सामना सुरू होताच मध्येच थांबवावा लागला. जसं हेलिकॉप्टर लॅण्ड झालं तसं खेळाडूंनी शांतपणे मैदान सोडलं आणि बाहेर पडले.
बिशपटॉन इथल्या परिसरात एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. त्याला तातडीनं उपचार करण्याची गरज होती. त्यामुळे जवळपास हेलिकॉप्टर थांबवण्यासाठी क्रिकेटच्या मैदाना व्यतिरिक्त दुसरं कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे तातडीनं एअर अॅम्ब्युलन्स क्रिकेटच्या मैदानात थांबवण्यात आली.
या सगळ्या घटनेनंतर अचानक खेळ थांबवावा लागल्यामुळे एअर अॅम्ब्युलन्स सर्व्हिसने खेळाडूंसह अधिकाऱ्यांची माफी देखील मागितली. खेळाडूंनी दाखवलेल्या सहयोगाबद्दल त्यांची आभारही मानले आहेत.