Moeen Ali Retirement: रोहित शर्मा, विराट कोहली यांनी काही दिवसांपुर्वी निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर भारतासह अनेक देशातील क्रिकेट खेळाडू आपली निवृत्ती जाहीर करत आहेत. दरम्यान इंग्लंडच्या चमूतून एक महत्वाची अपडेट समोर येतेय. इंग्लंडच्या ऑल राऊंडर खेळाडुने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय.  


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून वगळले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या अष्टपैलू खेळाडूने इंग्लंडसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2024 मध्ये गयाना येथे झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. उपांत्य फेरीत भारताविरुद्ध हा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारली होती. दरम्यान इंग्लंड विरुद्ध  ऑस्ट्रेलिया या आगामी व्हाईट बॉल मालिकेतून  अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला डच्चू देण्यात आला होता. 


सर्व फॉरमॅटमध्ये इंग्लंडसाठी 366 विकेट्स


मोईन अलीने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केला.  मोईनने अष्टपैलू खेळाडू म्हणून आपला खेळ दाखवत इंग्लंडसाठी 68 कसोटी, 138 एकदिवसीय आणि 92 T20I सामने खेळले आहेत. या खेळात त्याने 6678 धावा, आठ शतके, 28 अर्धशतक ठोकली आहेत. मोईनने सर्व फॉरमॅटमध्ये इंग्लंडसाठी 366 विकेट्स घेतल्या. 


मोईन फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार आहे. तसेच भविष्यात तो कोचिंगमध्येही सहभागी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.