नवी दिल्ली : टीम इंडीयाने (Team India) ऑस्ट्रेलियाकडून (Australia) वन डे सिरीज हरली असली तरी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) एका नव्या उंचीवर पोहोचलाय. आज कॅनबराच्या मनुका ओव्हलमध्ये विराट कोहलीने नवा रेकॉर्ड केलाय. आजच्या मॅचमध्ये २३ रन्स बनवल्यानंतर तो वन डे करियरमध्ये सर्वाधिक १२ हजार रन्स करणारा क्रिकेटर बनलाय. २५१ व्या वनडेमध्ये २४२ व्या खेळात त्याने हा पल्ला गाठलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा रेकॉर्ड बनवणारा विराट कोहली वन डे इतिहासातील सहावा बॅट्समन ठरला. ५० ओव्हरच्या क्रिकेटमध्ये १२,००० रन्स बनवण्यासाठी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)३०० डाव (३०९ मॅच) खेळला. 


या लिस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉंटींग तिसऱ्या स्थानी आहे. त्याने ३१४ डावात (३२३ मॅच) त्याने हा पल्ला गाठला. त्यानंतर श्रीलंकेचा कुमार संघकारा (३३६ डाव, ३५९ मॅच), सनथ जयसूर्या (३७९ डाव, ३९० मॅच), महेला जयवर्धनेचे (३९९ डाव, ४२६ मॅच) नाव लागते. 



टीम इंडीया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज कॅनबराच्या मनुका ओव्हलमध्ये समोरासमोर आलेयत. सलग दोन सामने हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडुंचा आत्मविश्वास वाढलाय तर टीम इंडीया तिसरा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. जर ऑस्ट्रेलियाने टीम इंडीयाविरोधात ३-० असा विजय मिळवला तर सलग दुसऱ्या सिरीजमध्ये भारताचा हा पराभव असेल. वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडने देखील टीम इंडीयाला याच फरकाने हरवले होते.



टीम इंडीयात बदल 


या अनुषंगाने दोन्ही टीममध्ये काही बदल करण्यात आलेयत. टीम इंडीयामध्ये ४ बदल करण्यात आलेयत. ओपनर मयांक अग्रवालच्या जागी शुभनम गिल, नवदीप सैनीच्या जागी टी नटराजन, युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आलीय.


ऑस्ट्रेलियात बदल 


टीम ऑस्ट्रेलियामध्ये जखमी डेविड वॉर्नर, मिशेल स्टार्कसला आराम देण्यात आलाय. कॅमरन ग्रीनची आज डेब्यू वनडे मॅच आहे. याशिवाय शॉन एब्बट, डार्सी शॉर्ट आणि एस्टन एगर यांना संधी देण्यात आलीय. 


भारताची प्लेइंग XI: शुभमन गिल, शिखर धवन, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, टी नटराजन, कुलदीप यादव.


ऑस्ट्रेलियाची प्लेइंग XI: आरोन फिंच (कॅप्टन), डार्सी शॉर्ट, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, एलेक्स कैरी, मोइजेस हेनरिक्स,एडम जम्पा, जोश हेजलवुड, कैमरन ग्रीन, एस्टन एगर, शॉन एब्बट.