IND vs SA T20 : टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी
सामन्यादरम्यान रोहितची धोनीशी बरोबरी...
बंगळुरू : एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa) दरम्यान टी-२० सीरीजचा तिसरा आणि शेवटचा सामाना खेळला जात आहे. भारतीय संघाने टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
टॉस जिंकल्यानंतर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी सर्वप्रथम फलंदाजीला सुरुवात केली. मात्र, पहिल्याच ओवरमध्ये रोहित शर्मा खाते न खोलताच बाद झाला.
या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाकडून सर्वाधिक टी-२० सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार एम.एस धोनीची बरोबरी केली आहे. धोनीने आतापर्यंत ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर रोहितचा हा ९८वा टी-२० आंतराष्ट्रीय सामना आहे.
टी-२० भारत आणि दक्षिण अफ्रिका सामन्यादरम्यान भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर दक्षिण अफ्रिका संघात एक बदल करण्यात आला आहे. एनरिच नोर्तेजेच्या जागी बेयुरान हेंड्रिक्स याला संघात स्थान देण्यात आले आहे.