Ishan Kishan : भारताच्या अनेक क्रिकेटर्सनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर राजकारणात एंट्री घेतली. अनेकांनी लोकसभा विधानसभेच्या निवडणुकाही लढवल्या, त्यात काहींना यश आले तर काहींना अपयश. सध्या देशाच्या राजकारणातील समीकरण बदलत असून महाराष्ट्र सह झारखंडमध्येही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भारताचा युवा क्रिकेटर ईशान किशन (Ishan Kishan) याचे वडील राजकारणात एंट्री करणार असून आज त्यांचा पक्षप्रवेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर असलेला ईशान किशन हा मूळ बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील असून तो देशांतर्गत रणजी स्पर्धेत झारखंडकडून खेळतो. तसेच ईशान किशन हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत असून तो संघातील महागड्या क्रिकेटर्सपैकी एक आहे. ईशान किशनचे वडील हे एक बांधकाम व्यावसायिक तर आई सुचित्रा पांडे गृहिणी आहेत. ईशान क्रिकेटच्या मैदानात चौकार षटकारांची आतिषबाजी करत असताना त्याचे वडील आता राजकारणात पदार्पण करणार आहेत.


मीडिया रिपोर्टनुसार ईशान किशनचे वडील प्रणव कुमार पांड्ये हे रविवारी 27 ऑक्टोबर रोजी जेडीयूमध्ये सामील होणार असून जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. इशान किशनचे वडील प्रणव कुमार पांडे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुपारी 3 वाजता जेडीयू कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय झा आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रविवारी जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रणव कुमार यांनी सांगितले.


हेही वाचा : एकेकाळी मार्केटमध्ये विकायचा नाड्या क्रिकेटमुळे नशीब फळफळलं! आज आहे 510000000 रुपयांचा मालक


 


प्रणव कुमार पांडे हे त्यांच्या समर्थकांसह पटणा येथे जाणार असून त्यांच्या सोबत यावेळी 100 गाड्यांचा ताफा असेल. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे हात बळकट करून विकसित बिहारचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने आपण जेडीयूमध्ये सामील होत असल्याचे प्रणव कुमार यांनी सांगितले. बिहारचा विकास करून मातृभूमीचा सन्मान वाढवण्याचे आपले स्वप्न आहे असे प्रणव कुमार यांनी म्हटले. पुढीलवर्षी बिहार विधानसभा निवडणुक होणार आहे तेव्हा या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार प्रवण कुमार पांडे यांना नवादा विधानसभा मतदारसंघातून किंवा औरंगाबाद जिल्ह्यातील ओब्रा विधानसभा मतदारसंघातून तिकीट देऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


ईशान किशनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी : 


ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली असून बारच काळ संघाबाहेर असलेल्या ईशान किशनला संधी देण्यात आली आहे.भारतीय ए संघ आणि ऑस्ट्रेलिया ए संघात मालिका खेळवली जाणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात आली आहे.   31 ऑक्टोबरला मेकॉयमध्ये आणि 7 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध चार दिवसांचे दोन सामने खेळणार आहे. २०२३ च्या अखेरीस  दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्यानतंर ईशान किशनवर बीसीसीआय नाराज होतं. तेव्हापासून ईशान किशनसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद आहेत. इतकंच नाही तर बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही ईशानला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता भारतीय ए संघातून दमदार कामगिरी करत टीम इंडियात एंट्री करण्याची चांगली संधी आहे.