...जेव्हा कोहली त्याच्या आवडत्या गायकाला भेटतो!
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली गायक अरिजीत सिंगचा मोठा चाहता आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली गायक अरिजीत सिंगचा मोठा चाहता आहे आणि अलीकडेच त्यांच्या भेटीचा योग आला. या भेटीचा फोटो देखील कोहलीने ट्विटरवर शेअर केला. हा फोटो शेअर करताना कोहलीने लिहिले, "माझ्यासाठी एका चाहत्याचा एका कलाकाराला भेटण्याचा क्षण. अरिजीत एक उत्तम माणूस आहे. त्याच्या आवाजाव्यतिरिक्त मला दुसरं कोणाचा आवाज मला इतका भावला नाही. अरिजीतला शुभेच्छा."
कोहलीसोबत इतर अन्य उत्तम खेळाडूंनी चॅरिटी फुटबॉलमध्ये सहभाग घेतला. ही मॅच बॉलीवूड सेलिब्रिटींविरुद्ध होती. यात रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, डीनो मोरिया, शुजीत सरकार हे सेलिब्रिटी सहभागी झाले होते.